सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणारे वाहन गोरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले. या घटनेतील फरार आरोपींविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Deola | देवळ्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
वाहन चालक फरार
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमरणा गावानजीक असलेल्या हॉटेल आनंद जवळ सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान चांदवडहून मालेगावच्या दिशेने मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच 17 बीवाय 0839) हा व स्विफ्ट कार क्रमांक (एमएच 03 बीसी 6088) हे टोचन करून दोन्ही वाहने मालेगावच्या दिशेने जात होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून या दोन्ही वाहनांचा रस्त्यावरील दुभाजकावर आदळून अपघात झाला, सदर अपघात होताच वाहनावरील चालक तेथून पसार झाले. थोड्यावेळाने स्थानिक लोकांनी वाहनाजवळ जाऊन तपास केला असता स्विफ्ट कारमध्ये गोमांस असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले.
Deola | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा अपघात
देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत स्थानिक बजरंग दल व गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी देवळा पोलिसांना ही खबर कळवली. घटनास्थळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. सदर अपघात व गोमांस तस्करीबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम