Nashik Crime | खळबळजनक!; चांदवडमध्ये क्लास चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

0
23
#image_title

Nashik Crime | नाशिकच्या चांदवड शहरातील एका कम्प्युटर क्लास संचालकाने व त्याच्या मित्राने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार चांदवड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. या घटनेने आता संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून चांदवड पोलिसांकडून शोएब ताहेर नाईक (रा.चिंचबन) व विशाल गोविंद जाधव (रा. सोमवार पेठ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | येवला तालुका पोलिसांची मोठी कामगिरी; चैन चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश

क्लासचालकांकडून पिडितेचा विनयभंग

बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलात युनिकॉन कंप्यूटरचा संचालक शोएब नाईक व विशाल जाधव या दोघांनी ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान, वेळोवेळी फिर्यादीस अयोग्यरीत्या स्पर्श करीत विनयभंगा केला. पिडितेने त्याला विरोध केला असता “तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही हे कोणाला सांगणार नाही” असे म्हणत तीला एकटीला फ्लॅटवर बोलावले. यावेळी पीडितेने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता तिची वाट अडवून तिला रोखण्यात आले. तसेच रस्त्याने पाठलाग करून पीडितेचा विनयभंग करण्यात आला.

Nashik Crime | नाशकात दिवसाढवळ्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

आरोपींना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कोठडी

याप्रकरणी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दोन्ही संशयतांना अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली असून दोघांची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here