Nashik Crime | नाशिकमध्ये भरदिवसा टोळक्याकडून तरुणावरती कोयत्याने वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौका जवळून, पंडित कॉलनी परिसराकडे जात असताना आकाश धनवटे या तरुणावर टोळक्याने हल्ला केला. ही घटना सकाळच्या सुमारास घडली.
Nashik Crime | नाशिकमध्ये चक्क चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न
जखमी आणि हल्लेखोर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर संशयित अथर्व दाते याने त्याच्या चार ते पाच साथिदारांसोबत आकाश धनवट याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. हल्ल्यातील संशयित आणि जखमी आकाश हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम