Nashik Crime | नाशिकमध्ये हद्दपार गुंडाची दहशत; कोयत्याच्या धाकावर दुकानदाराकडे खंडणीची मागणी

0
35
#image_title

Nashik Crime | नाशिक रोड परिसरात हद्दपार गुंडाकडून दुकान चालकाला कोयत्याने धमकावत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हद्दपार असूनही विनापरवानगी शहरात वास्तव्य करून गुंडाने सुभाष रोडवरील एका दुकान चालकास कोयत्याचा धाक दाखवत दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी गोपाल ईश्वरदास किशनानी (रा.गुलजारवाडी नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिसांनी सनी शाम भाटिया (रा. गुलजारवाडी नाशिक रोड) विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime | खळबळजनक!; चांदवडमध्ये क्लास चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

26 सप्टेंबरला घडली घटना

शहर पोलिसांकडून सनी भाटियाला गंभीर गुन्हे असल्याकारणाने हद्दपार करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील त्याने 26 सप्टेंबरला रात्री 9 वाजता के. बी. एन. मार्केट मधील राजधानी जनरल स्टोअर चालक किशनानी यांना कोयत्याचा धाक दाखवत दरमहा 5 हजार रुपये खंडणीची मागणी केली. किशनानी यांनी सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलिसांत याविरुद्ध तक्रार नोंदवली. यापूर्वी भाटियाने किशनानी यांना खंडणीसाठी धमकावले असल्याचे त्यानंतर समोर आले असून पोलिसांनी सनीला अटक केली आहे.

Nashik Crime | येवला तालुका पोलिसांची मोठी कामगिरी; चैन चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश

हद्दपारचे कारवाई वरवरची

या प्रकरणानंतर हद्दपारीची कार्यवाही झाल्यानंतर देखील सनी शहरातच वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले असून त्याने गुन्हे करून सुभाष रोड भागातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हद्दपार करूनही तो शहरातच ठाण मांडून खंडणी मागत असल्याचे उघड झाल्याने हद्दपारची कारवाई नावालाच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here