Sharad Pawar NCP | थोरल्या पवारांनी भाजपची विकेट पाडली; माजी राज्यमंत्री शरद पवारांच्या गळाला

0
64
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP

Nanded News:  महाराष्ट्रासह देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, यानंतर राज्यात भाजपला गळती लागल्याचे लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचा आणखी एक बडा नेता शरद पवारांच्या गळाला लागला असून, भाजपला सोडचिठ्ठी देत हे माजी राज्यमंत्री आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती धरणार आहेत.आज संध्याकाळी ४ वाजता अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.

महायुतीत इतर पक्षांमधून आलेल्यांना आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना संधी दिली जात असून, जुन्या नेते, पदाधिकाऱ्यांना डावललं जात असल्याची खदखद अनेक भाजप नेत्यांनी बोलूनही दाखवली होती. याचाच परिणाम म्हणून राज्यात भाजपमध्ये नाराज असलेले अनेक नेते महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री असलेले नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते सूर्यकांता पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत घरवापसी  केली. यानंतर आता माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर हेदेखील आज शरद पवार गटात घरवापसी करणार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राष्ट्रवादीतूनच केली होती. (Sharad Pawar NCP)

Sharad Pawar | भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवार नाशिक दौऱ्यावर; ही वेगळ्या राजकारणाची ‘नांदी’..?

Sharad Pawar NCP | अशोक चव्हाणांमुळे भाजप सोडली..?

नांदेड (Nanded) जिल्ह्यात भाजपला (BJP) मोठे खिंडार पडले असून, माजी केंद्रीय मंत्र्यांनंतर आता माजी राज्यमंत्रीही शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. तर, राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavhan) यांना भाजपमध्ये स्थान दिल्यानंतर हे नेते नाराज होते. त्यामुळे याच नाराजीतून या दोन्ही नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

१० वर्षांपासून काम करत असूनही संधी नाही 

मागील १० वर्षांपासून माधवराव किन्हाळकर हे भाजपमध्ये काम करत असूनही त्यांना संधी न दिल्याने व अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये स्थान दिल्याने किन्हाळकर हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे.

महिनाभरातच मराठवड्यातील दुसऱ्या बड्या नेत्याने भाजपला रामराम थोकल्याने हा मराठवाड्यात भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी साथ सोडल्याने मराठवड्यात भाजपला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. भाजपमधील नाराजी उघडपणे समोर येत असल्याने भाजप आता आगामी काळात काही मोठा निर्णय घेऊन पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी पर्यटन करणार का..? हे पहावे लागणार आहे.

Sharad Pawar Baramati | विधानसभेसाठी शरद पवारांनी कंबर कसली; जे ३५ वर्षात नाही केलं ते आता करणार

शरद पवारांनीच केलं होतं मंत्री

नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असलेले डॉ. माधव किन्हाळकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. यात त्यांचा 53,224 मतांनी पराभव झाला. त्यांनी 1991 ते 1999 या कालावधीत भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेससाठी काम केले होते. यानंतर शरद पवारांच्या मंत्रीमंडळात 1991 ते 1995 मध्ये त्यांनी गृह व्यवहार, महसूल व सहकार राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here