Sharad Pawar | भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवार नाशिक दौऱ्यावर; ही वेगळ्या राजकारणाची ‘नांदी’..?

0
48
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar |   सोमवारी राजकीय वर्तुळाला खळबळ उडवणारी घटना राज्याच्या राजकारणात घडली. सकाळच्या सुमारास भेटीची वेळही न घेता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे थेट शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, ही भेट राजकीय नसून मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत असल्याची माहिती स्वतः मंत्री छगन भुजबळांनी दिली. यानंतर आता शरद पवार हे शुक्रवारी अहमदनगर व नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

काल भुजबळ – पवार भेटीनंतर अवघ्या दोन दिवसात शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात पवार काही राजकीय समिकरणं जुळवणार का..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आयोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीनंतर दोनच दिवसात शरद पवार नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार असल्याने काही राजकीय समिकरणांची जुळवा जुवळ शरद पवार करतात का, हे पाहणे या निमित्याने महत्वाचे ठरणार आहे.(Sharad Pawar)

Bhujbal Pawar Meeting | काल टिका आज भेटीगाठी; पवार-भुजबळ भेटीमागे दडलंय काय..?

Sharad Pawar | उत्तर महाराष्ट्रावर शरद पवारांचे विशेष लक्ष..?

तर, या लोकसभा निवडणुकीतही उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात शरद पवारांचा मोठा वाटा असून, कांदा प्रश्नीही शरद पवार स्वतः मैदानात उतरले होते. त्यामुळे एकूणच नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रावर शरद पवारांचे (Sharad Pawar) विशेष लक्ष असल्याचे दिसते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शरद पवार दोन दीवशीय नाशिक,नगर दौऱ्यावर येणार असून, यावेळी ते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित असणार आहेत.

स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंती निमित्त भांगरे यांच्या कुटुंबीयांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. स्वर्गीय अशोक भांगरे हे अकोले तालुक्यातील पिचड यांचे कट्टर विरोधक असून, त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसपासून केली. त्यानंतर ते काहीकाळ भाजपमध्ये होते आणि राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असताना वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाले.

Bhujbal Pawar Meet | भुजबळांनी सांगितले भेटीमागचे कारण; म्हणाले ‘..मला मंत्रीपदाची परवा नाही’

वेगळ्या राजकारणाची नांदी नाही ना..?

राज्यच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे परवा जाहीर टिका करणारे मंत्री छगन भुजबळ हे काल अचानक कोणालाही न सांगता शरद पवारांची भेट घेतात. शरद पवार, सुप्रिया सुळे मोदीबाग या पुण्यातील निवासस्थानी असतानाच सुनेत्रा पवार या तेथे जातात आणि भुजबळांच्या भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत शरद पवारांचा ‘नाशिक दौरा’ याचे जरी काही समीकरण जुळताना दिसत नसले. तरी ही आगामी काळात होऊ पाहणाऱ्या वेगळ्या राजकारणाची ‘नांदी नाही ना..?’ असं प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here