Ajit Pawar : लोकसभेत मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच मार्केटिंग सुरू केली आहे. दरम्यान, नेहमी मिश्किल, दिलखुलासपणे जाहीर मत व्यक्त करणारे अजित दादा कधी नव्हे ते भावनिक व्हिडिओ बनवत मतदारांना साद घालताना दिसले. तर, बारामतीमधील जनसन्मान मेळाव्यात गुलाबी जॅकेट, गुलाबी स्टेज, गुलाबी बॅनर, लावत महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेऊन ब्रॅंडिंग करतानाही दिसले. या गुलाबी जॅकेट आणि एकूणच ‘पिंक पॉलिटिक्स’वरून विरोधकांनी अजित पवारांवर टिकास्त्र सोडले. यानंतर अखेर स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनीच याबाबत मौन सोडले असून, अचानक गुलाबी रंग का प्रिय झाला..? याचे स्पष्टीकरण दिले आहे.
Ajit Pawar | ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय घेण्यासाठी दादांची धडपड..?
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील वातावरण हे महायुतीसाठी सकारात्मक होताना दिसत आहे. तर, या योजनेला समोर ठेऊन महिला मतदारांना आकर्षित करण्याचा महायुतीचा विचार असून, याचसाठी अजित पवारांच्या (Ajit Pawar Group) राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाला प्रधान्य दिले जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या सभा, रॅलीमध्ये बॅनर्स, पोस्टर्स, स्टेज असे सगळीकडे गुलाबी रंगाचा वापरला जात असून, विशेष म्हणजे या सभेत स्वतः अजित पवार देखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले.
NCP Ajit Pawar | अजित पवारांचा मोर्चा मुस्लीम मतांकडे; मुस्लीम आरक्षणाची शिफारस करणार..?
मार्केटिंग कंपनीच्या सल्ल्यानुसार अजित दादा चालणार..?
तर, याचे मुख्य कारण म्हणजे सध्या अजित पवार गटाकडून मार्केटिंग टीमच्या सल्ल्यानुसार कामं केली जात असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाच्या प्रसिद्धीचे काम हे नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स (DesignBoxed Innovations) या सुप्रसिद्ध कंपनीला दिले असून, या कंपनीच्या सल्ल्यानुसारच आता अजित पवार गटाचे इमेज बिल्डिंगचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी या कंपनीने कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार आणि राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठीही काम केले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गट आता नरेश अरोरा यांच्या सल्ल्यानुसार चालणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. (Maharashtra Vidhansabha)
कंपनीच्या सल्ल्यानेच गेले होते सिद्धिविनायक दर्शनाला..?
याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी अजित पवार पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. यामागेही नरेश अरोरा यांची स्ट्रॅटजी असून, अजित पवार यांची प्रतिमा ही सॉफ्ट हिंदुत्त्वाकडे झुकणारी असावी हे दाखवण्यासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनाचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.
Ajit Pawar MLA | अजितदादा गटात भूकंप..?; १० आमदार परतीच्या वाटेवर
आता दादा फक्त गुलाबी जॅकेटच घालणार..?
एवढेच नाहीतर आता याच कंपनीच्या सल्ल्यानुसार प्रतिमावर्धन करण्यासाठी अजित पवार गटाकडून सगळीकडे गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे. तर, आता अजित पवार हे आपल्या पांढऱ्या कुर्त्यावर केवळ गुलाबी रंगाचे जॅकेट घालणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी थेट 12 गुलाबी रंगाचे जॅकेट तातडीने शिवून घेतल्याचीही माहिती आहे. यासोबतच अजित पवार आता पंधरा कुर्ता आणि गुलाबी जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ (NCP party Symbol) ही लावणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांना अचानक गुलाबी रंग इतका प्रिय का झाला..? आणि दादांच्या या पिंक पॉलिटिक्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम