Sharad Pawar Baramati : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जगावाटपाची चर्चाही सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत.
बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असून, येथे ‘दिल्लीत ताई आणि राज्यात दादा’ असे सूत्र गेल्या निवडणुकीपर्यंत होते. मात्र, आता अजित पवारांच्या (Ajit Pawar)बंडानंतर समीकरणं बदलली असून, लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha Constituency) अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. (Sharad Pawar Baramati)
Sharad Pawar Baramati | युगेंद्र पवार अजित दादांच्या विरोधात मैदानात..?
दरम्यान, यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगण्याची चर्चा असून, युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात उभे राहतील अशी चर्चा आहे. तर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवारांनी कंबर कसली असून, अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी शरद पवार तीन दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते या तीन दिवसांत तालुका पिंजून काढणार आहेत.(Sharad Pawar Baramati)
Baramati Lok Sabha | बारामती शरद पवारांचीच; दादा पत्नीलाही निवडणून आणण्यात अपयशी
बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती
तर, विशेष म्हणजे या दौऱ्यात युगेंद्र पवार सहभागी होणार असल्याने खरंच युगेंद्र पवार अजित दादांच्या विरोधात मैदानात उतरणार का..? विधानसभेसाठीच युगेंद्र पवारांची शिकवणी आहे का..? असा सवाल उपस्थित होत आहे. “बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजेच बारामती” हे समीकरण राज्याच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे.(Sharad Pawar Baramati)
मात्र, आता पवारांचेच दोन गट पडल्याने बारामतीची जनता विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभी राहणार हे पहावे लागणार आहे. शरद पवारांनी ३५ वर्षांपूर्वी बारामती विधानसभेची धुरा ही अजित पवारांकडे सोपवली होती. त्यानंतर त्यांनी असा बारामती मतदार संघ कधीही पिंजून काढला नव्हता. मात्र, आता परिस्थिती बदलल्याने त्यांना स्वतः मैदानात उतरावे लागले आहे.
पवारांनी जे ३५ वर्षात नाही केलं ते या निवडणुकीत
दरम्यान, गेल्या ३५ वर्षांत शरद पवारांनी बारामती पिंजून काढली नव्हती. मात्र, जे त्यांनी ३५ वर्षात नाही केलं ते पवार या निवडणुकीत करत आहेत. तर, स्वतः शरद पवार मैदानात उतरत स्वतः मतदार संघ पिंजून काढत असल्याने विधानसभेला अजित पवारांसमोर मोठं आव्हान असणार यात शंका नाही.
Baramati | ‘दादा वहिनी हे तुमचंच कुटुंब’; कुटुंब विरोधात पण बारामतीकरांची साथ
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम