Ahmednagar | सरकारची डोकेदुखी वाढली; अहिल्यानगर नामांतराविरोधात हायकोर्टात याचिका

0
47
Ahmednagar
Ahmednagar

अहमदनगर : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली होती. अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मठिकाण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगरचे (Ahmednagar) नाव बदलून अहिल्यानगर (Ahilyanagar) करणार असल्याची घोषणा केली होती.

केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच विरोध याचिका 

यानंतर, 13 मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही या नामांतरास मंजूरी देण्यात आली असून, हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच या नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (High court) आव्हान देण्यात आले असून, विरोध करणारी जनहीत याचिका दाखल झाल्याने याप्रकरणी येत्या २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Dhangar Reservation | धनगर मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

Ahmednagar | नामांतराची प्रक्रिया काय..?

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलल्यानंतर अहमदनगरचेही नाव बदलण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व संघटनांतर्फे करण्यात आली होती. दरम्यान, यानुसार गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून, या नामांतरास केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका व महानगरपालिका यांचे नाव बदलण्याची प्रक्रिया महसूल व नगर विकास विभागातर्फे राबवण्यात येईल.

मात्र, ही प्रक्रिया प्रलंबित असतानाच या नामांतराविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आता सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख व पुष्कर सोहोनी यांनी मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही जनहित याचिका दाखल केली असून, २५ जुलै रोजी यावर सुनावणी पार आपडणार आहे. दरम्यान, या प्रकरणी आता न्यायालय काय निर्णय घेणार..? हे पहावे लगणार आहे.

Ahmednagar News | भाजप मंत्र्यांच्या सुपुत्राला पराभव पचवणे कठीण..?; नवनिर्वाचित खसदार समर्थकावर हल्ला

‘अहमदनगर’ नावाचा इतिहास

अहमदनगरला हे नाव अहमदशहा बादशहाच्या नावामुळे मिळाले असून, १४९०मध्ये बादशहाने या शहराची स्थापना केली होती. त्यावेळी, नगर शहर हे निजामशाहीची राजधानी होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here