Mahayuti Political | विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर आता नव्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत. निकाल लागून तीन दिवस उलटून गेले असले तरी मुख्यमंत्री पदाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. अशातच महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढत सुरू झाले असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आता सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका.” असा खोचक सल्ला देत आणि ती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधला.
Mahayuti Political | “उपमुख्यमंत्री व्हा अन्यथा…”; भाजपकडून शिंदेंसमोर दोन पर्याय
काय म्हणाले होते महेंद्र थोरवे?
कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आरोप कले होते. विजयानंतर बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी “माझा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. महायुतीत असून देखील त्यांनी मला पाडण्यातकरिता पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्यांचा हा डाव माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उलटवला आणि माझा विजय झाला. माझ्या मतदारसंघातून सुनील तटकरे यांचा पराभव झाला.” असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका होती.
“महेंद्र थोरवे काठावर वाचलेत”- आदिती तटकरे
“महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी गद्दारी केली.” या वक्तव्यावरून सुनील तटकरे यांच्या कन्या व श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले असून “महेंद्र थोरावे काठावर वाचले आहेत. मी त्यांना फारसे महत्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदार संघ सांभाळावा. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. यश नम्रतेने स्वीकारायला हवे. मी 82 ते 83 हजार मतांनी निवडून आली आहे. पण या यशाचा स्वीकारा मी नम्रतेने केला आहे.” असं म्हणत थोरवे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम