Election Commission | निवडणूक आयोगाकडून फेर मत मोजणीस मान्यता; ‘या’ मतदारसंघात फेर मतमोजणी होणार!

0
71
#image_title

Election Commission | राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवत बहुमताने पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता राखली. या निवडणुकीत भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपा राज्यातील मोठा पक्ष ठरला. यानंतर आता महाविकास आघाडीकडून अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणी घेण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून अनेक मतदारसंघांमध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पराभूत झालेले उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी करावी. या मागणीला आता मान्यता मिळाली आहे.

Election Commission | अखेर विरोधकांच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली

सुधाकर बडगुजर यांच्या मागणीस मंजुरी

विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालावर आक्षेप घेत सुधाकर बडगुजर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार असून बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे.

दरम्यान, नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या असून सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना 1 लाख 41 हजार 725 मध्ये मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना 73 हजार 651 मते मिळाली. तसेच मनसेच्या उमेदवाराला 46 हजार 649 मते मिळाली आहेत.

राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरातांची फेर मतमोजणीची मागणी

तसेच ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय व्यक्त केला असून यामुळे औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे व बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत. नियमानुसार 5 टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणी होऊ शकते. त्यासाठी शुल्क भरावा लागत असून ही सगळी प्रक्रिया पार पडून फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचे या उमेदवारांनी सांगितले आहे.

Election Commission: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह 5 राज्यांतील निवडणूक जाहीर, भाजपा कॉँग्रेसचा कस लागणार

त्याचबरोबर, परळी मतदारसंघांमध्ये 140 ते 150 बुथवर मृत लोकांचे मतदान झाले असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवण्यात आले असून अद्याप याबाबत निवडणूक आयोगाने कोणतेही उत्तर दिले नसल्याची माहिती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here