Mahayuti Sarakar | राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. अशातच आता महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा सपाटा लागल्याचे पाहायला मिळते आहे. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध मोठे निर्णय घेण्यात आले होते. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या अखेरच्या बैठकीत तब्बल 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Mahayuti Sarkar | महाराष्ट्र सरकारची परदेशी कंपनीत उधारी?; नेमकं प्रकरण काय?
नव्या महामंडळांची स्थापना करणार
राज्य सरकारने यामध्ये काही नवी महामंडळे स्थापन करण्यास मंजुरी दिली असून संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. शिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लेवा पाटील समाज महामंडळाला मंजुरी देण्यात आली असून यासोबत पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ओबीसी नॉन क्रिमिलियरचा उत्पन्न टप्पा 15 लाखांपर्यंत नेण्यात आला असून त्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.
Mahayuti Sarkar | शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; निधी मिळत नसल्याने उचलले पाऊल
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:
* सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना करांसाठी जागा देण्याचा निर्णय तर सावनेर, कणकवली, जीहे काठापुर, अंबरनाथ, राजापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता.
* महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमात सुधारणा व राज्यातील तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता तसेच महिला व बाल विकासासाठी राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार.
* ग्रामविकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपाध्यक्ष, उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ. राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी आणणार तसेच शाळांना 20 टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा देणार.
* सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जे हक्काने रूपांतरित करणार तसेच केंद्र शासनाची अग्रीस्टाक योजना राबवणार.
* मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी तसेच पालघर जिल्ह्यातील विविध गावातील जागा एमआयडीसीला
* बोरिवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दिली जाणार असून महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा करणार.
* कुर्त्यातील शासकीय जमीन डायलिसिस सेंटर साठी शाहीर अमर शेख प्रभो धनीला तर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प आणणार.
* पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना तसेच भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणीपुरवठा विभागास हस्तांतरित करणार.
* रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खाजगी जमिनीचा मोबदला देणार त्याचबरोबर मराठवाड्यातील शाळेंकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी देणार.
* न्यायमूर्तींच्या खाजगी सचिवांना सचिवाला येईल संवर्ग त्याचबरोबर नाशिक रोड तुळजापूर वनी यवतमाळ येथे न्यायालय उभारणार तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार.
* महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देणार तसेच शबरी महामंडळाच्या थक हमीची मर्यादा वाढवून 100 कोटी करणार त्याचबरोबर देवळाली तीन भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला देणार.
* मौलाना आझाद महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ करणार तसेच मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करणार त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या परेड ग्राउंड साठी पशुसंवर्धन विभागाची जागा देणार आहे.
* समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता मिळाली असून कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव देणार त्याचबरोबर आपत्तीस ओमीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाणार.
* राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी दिली जाणार तर शिंपी गवळीत लाडशाखीय वाणी वाणी लोहार नाथपंथीय समाजासाठी महामंडळे स्थापन करणार तसेच पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे.
* कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीला मान्यता मिळाली असून सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा देणार.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम