Nashik News | लासलगावात स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी तयार करून त्या माध्यमातून हजारो नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी सतीश काळे याला लासलगाव पोलिसांनी धाराशिव पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. तर दुसरा संशयित आरोपी योगेश काळे विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी केली गेली असून, शोधपथके रवाना केल्याची माहिती निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी दिली.
Nashik News | त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या 10 मुलांचा दहशतवादी विरोधी पथकाकडून तपास सुरू
पोलिसांकडून टाकळी विंचूर येथील कार्यालयावर छापेमारी
लासलगाव पोलीस ठाण्यात मंगळवार आणि बुधवारी निफाडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पालवे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी जबाब नोंदवत काही एजंट व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मंगळवारी सतीश काळेचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी पहाटे लासलगावात आणण्यात आले. त्यानंतर पथकाकडून संशयित काळेच्या टाकळी विंचूर येथील श्रीराम फायनान्स कार्यालयाचे सील तोडत तपासणी केली. तसेच त्याच्या निवासस्थानी पंचनामा करण्यात आला. यावेळी डीव्हीआर जप्त करण्यात आला असून घराची झडती घेण्यात आली तसे संशयितांची बँक खाती पोलिसांनी गोठवली असून बँक व्यवहारात देण्यात आलेल्या चेकची माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलिस अधिकारी कार्यालयात ठाण मांडून असून नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता पोलीस यंत्रणेशी संपर्क साधत तक्रार द्यावी. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Nashik News | चांदवडमध्ये विहिरीत पडून माय-लेकाचा मृत्यू; परिसरातून हळहळ व्यक्त
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
ज्या नागरिकांनी गुंतवणूक केली त्यांनी आपल्या गुंतवणुकीविषयी माहिती देत, कागदपत्रे जमा करावीत. आपल्याकडून मिळालेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई करतीलच, परंतु नागरिकांनी पोलिसांना याबाबतीत सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम