Nashik News | त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या 10 मुलांचा दहशतवादी विरोधी पथकाकडून तपास सुरू

0
85
#image_title

Nashik News | त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हागिरीच्या पायथ्या लगत असलेल्या धर्म शाळेच्या प्राचीन दगडी इमारतीत 10 गैरह हिंदू युवकांनी नमाज पठण करत त्याचे मोबाईलवर फोटोशूट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून या युवकांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये हे युवक केरळ राज्यातील मल्लापुरम जिल्ह्यातील असून तेथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे समोर आले. ते पर्यटनासाठी येथे आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना दहशतवादी विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार सोमवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला.

Nashik News | चांदवडमध्ये विहिरीत पडून माय-लेकाचा मृत्यू; परिसरातून हळहळ व्यक्त

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडला प्रकार

त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पायथाला भातखडा येथील धर्मशाळेच्या प्राचीन दगडी इमारतीत गावातील युवक दररोज सकाळी व्यायामा करिता येत असतात. सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास येथे 10 युवक आले व सरळ धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावर गेले. तिथे त्यांनी आपले कपडे बदलले व नमाज अदा केला. नमाज अदा करताना त्यांनी त्याचे फोटोही काढले. त्यानंतर या संपूर्ण प्रकारावर हरकत घेत व्यायामासाठी आलेल्या युवकांनी नमाज पठन करणाऱ्या युवकांची विचारपुस केली असता, त्यावर त्यांनी “आम्ही केरळ येथून आलो आहोत.” असे म्हणत, “नमाजची वेळ झाली होती म्हणून नमाज पठन करत होतो. ” असे सांगितले. त्यानंतर या प्रकाराबद्दल त्र्यंबक पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत ठाण्यात आणले.

Nashik News | नाशिक-मुंबई लोकलची मागणी पूर्ण होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले स्पष्ट

याप्रकरणी पुढील तपास सुरू

तिथे त्यांचे आधार कार्ड व मोबाईलची तपासणी करत त्र्यंबकेश्वर येथील ज्या लॉजवर ते मुक्कामाला होते, तिथे चौकशी करण्यात आली मात्र त्यात काही वावग आढळले नाही. त्यानंतर दुपारी पोलिसांनी नाशिक येथून दहशतवादीविरोधी पथक पाचारण केले व युवकांना त्यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे.

“हे सर्व विद्यार्थी केरळ राज्यातील महाविद्यालय शिक्षण घेत असून त्यांची सर्व माहिती नोंदवून घेण्यात आली आहे.पर्यटनासाठी ते इथे आल्याचे निदर्शनास आले आहे.”

– बिपीन शेवाळे, पोलिस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here