Mahayuti Political | “उपमुख्यमंत्री व्हा अन्यथा…”; भाजपकडून शिंदेंसमोर दोन पर्याय

0
68
#image_title

Mahayuti Political | विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीत आता सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2019 प्रमाणेच आता देखील भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून पेच निर्माण झाला असून पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. परंतु, 132 जागा जिंकणारा भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नसून याबद्दल शिंदे यांना सांगण्यात आले आहे.

Mahayuti Sarakar | मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचा निर्णयांचा सपाटा; घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांनी आजच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला असून नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार असून यावेळी सत्ता स्थापनेबद्दल चर्चा होणार असून मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच अमित शहाच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय जाहीर करणार असल्यामुळे मुख्यमंत्री पदाबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. तर मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्यामुळे शिंदे नाराज असल्याची ही माहिती आहे.

अमित शहाच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय जाहीर करणार

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदाकरिता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला असून “आपल्याला अजून एक वर्ष मुख्यमंत्रीपद राहू द्या.” अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. यानंतर “देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आपण बाजूला होऊ” असे देखील शिंदे यांनी नेतृत्वाला सांगितले आहे. विधानसभा निवडणुका आपल्या नेतृत्वात झाल्या. महायुतेने त्यात घवघवीत यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत निकालानंतर तातडीने आपल्याला बाजूला केल्यास, त्यातून चुकीचा संदेश जाईल.” अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याची माहिती सुत्रांची माहिती आहे.

भाजपकडून शिंदेंना दोन पर्याय

दरम्यान, भाजप शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नसून भाजपकडून शिंदेंना दोन पर्याय देण्यात आले आहेत. “नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा अन्यथा केंद्रात येऊन आपल्या जागी मुलाला राज्य सरकारमध्ये पाठवा.” असे दोन प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबद्दल शिंदे व फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली असून त्यावर कोणताही निर्णय निघाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भाजपचा केंद्रीय नेतृत्व हस्ताक्षर करणार आहे.

Mahayuti Sarkar | महाराष्ट्र सरकारची परदेशी कंपनीत उधारी?; नेमकं प्रकरण काय?

राज्यात बिहार पॅटर्न राबवावा शिवसेनेचा आग्रह

राज्यामध्ये बिहार पॅटर्न राबवण्यात यावा. बिहारमध्ये कमी जागा असून देखील जेडीयुच्या नितीशकुमार यांना देखील भाजपाने पुन्हा मुख्यमंत्री केले. तसेच महाराष्ट्रात देखील करण्यात यावे. असा आग्रह शिवसेनेकडून धरण्यात आलआ असून भाजप बिहार पॅटर्न राबविण्याचा मनस्थितीत नसल्याचे समजते. भाजपाने शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता. असे देखील भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here