Political News | “फक्त मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करून भागत नाही”; सरकार स्थापनेबाबत बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

0
39
#image_title

Political News | विधानसभा निवडणुकीचा निकालात स्पष्ट बहुमत मिळवून महायुतीने पुन्हा सत्ता मिळवली. परंतु निकालानंतर तीन दिवस उलटून गेले असले तरी महायुतीकडून मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री कोण होणार आणि केव्हा होणार या सोबतच सत्ता स्थापन व्हायला उशीर का लागत आहे? याचे कारण सांगितले आहे.

Mahayuti Political | सत्ता स्थापनेपूर्वीच युतीत बिनसलं?; सेना-राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? 

“तीन पक्षांचे सरकार बनवताना थोडा वेळ लागतोच. फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करून भागत नाही. मंत्रीपद कशी वाटायची? कोणाला कोणते खाते द्यायचे? पालकमंत्री कुठे व कोणाला नेमायचे? हि सर्व सूत्रे तयार करून सरकार तयार होते. यामध्ये थोडा वेळ जातो. लवकरच सरकार स्थापन होईल. शपथविधी नोव्हेंबर मध्ये होईल की डिसेंबर महिन्यात हे पॅरामीटर नाही. सध्या काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.” असे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

“पक्षाचे नेते योग्य निर्णय घेतात”

तसेच पुढे बोलत, “भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. तर महायुतीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री हवेत असे वाटते. यावर तीनही पक्षांचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाकडून घेतलेल्या निर्णयामुळे भाजपचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय घेतात.” असे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

Political News | विधानसभेला शिंदेंच्या विरोधात लढलेला उमेदवार करणार शिंदेसेनेत प्रवेश!

महाविकास आघाडीला टोला लगावला

“महायुतीचा मुख्यमंत्री लवकरच शपथ घेईल. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत बेईमानी केली होती. तेव्हा त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी दीड महिना लागला होता.” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्याने महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने मते दिली आहेत.” असे देखील ते यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here