राज्यात पावसाचा जोर वाढला, मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता 

0
3

मुंबई : १९ जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. ११ जून नंतर पावसाने दडी मारली होती. मात्र रविवारपासून मुंबई व उपनगरात पावसाने जोर पकडला आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याची मुंबई कुलाबा हवामान खात्याने अंदाज (Mumbai Weather update) वर्तवला आहे. दरम्यान कफपरेड परिसरात झाड, तर चेंबूरला दरड कोसळल्याची घटना रविवारी घडली होती.

पुणे आणि परिसरातील पावसाचा जोर वाढणार आहे. यात कोल्हापूर आणि सातारा परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Mumbai Weather update) अंदाज आहे.

हे सुध्दा वाचा : 

निवडणुकीच्या आधी मोठा ट्विस्ट, अमेरिकेला गेलेला एक आमदार मतदानासाठी मुंबईत दाखल

आज सायंकाळी ५ वाजता अरबी समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून यावेळी ४.२२ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच मंगळवारी पहाटे ५.२७ वाजता ३.४८ मीटरच्या लाटा उसळू शकतात.

आज समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याने नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात किंवा समुद्र किनारी जाऊ नका, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून (Mumbai Weather update) करण्यात आले आहे.

हिंदमाता परिसर पाण्याखाली जाऊ नये, यासाठी भूमिगत टाक्या बसवल्या असून ३ कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकतो. (Mumbai Weather update) पावसाचे पाणी साचल्यामुळे पूर आल्यास एनडीआरएफ, नौदल तैनात करण्यात आले आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे. जून महिन्याच्या शेवटी मुंबई महापालिका पाणी साठ्याबाबत आढावा घेऊन निर्णय (Mumbai Weather update) जाहीर करणार आहे.

 

नाशिकच्या रिक्षाचालकाचा नाशिक ते लडाखपर्यंतचा प्रवास; 27 वर्ष जुन्या बाईकद्वारे स्वप्न केले पूर्ण

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here