नाशिकच्या रिक्षाचालकाचा नाशिक ते लडाखपर्यंतचा प्रवास; 27 वर्ष जुन्या बाईकद्वारे स्वप्न केले पूर्ण

0
3

द पॉईंट नाऊ विशेष (नाशिक) :

बाईक रायडींग हा खूप जणांचा एक आवडीचा विषय असतो. त्यात आपल्या बाईकवर लॉंग ड्राइव्हवर अनेक जण जात असतात. असाच एक नाशिकचा अवलिया आहे. त्याने चक्क आपल्या 100 CC च्या बाईकवरुन नाशिक ते लडाख पर्यंतचा प्रवास केला.

तर या अवलिया नाशिककराचे नाव आहे कैलास भेरड. कैलास भेरड हे रिक्षाचालक आहेत. आणि त्यांनी जवळपास दीड ते दोन वर्षे या प्रवासाची तयारी करून, आपलं लॉंग राईडचं स्वप्न पूर्ण केलं. जवळपास 5500 किमी चा प्रवास भेरड यांनी आपल्या 100 CC च्या बाईकवरून पूर्ण केला.

लॉंग राईडवर जाणारे रायडर हे मुख्यत्वे जास्तीत जास्त CC च्या बाईकवरून अर्थात, एनफिल्ड, KTM, आणि इतर स्पोर्ट्स बाईक ज्या जवळपास 350 CC पर्यंत असतात अशा बाईकचा वापर करतात. मात्र बेरड यांनी आपल्या Suzuki च्या 100 CC च्या बाईकवरून 5500 किमी चा प्रवास करत आपले स्वप्न साकार केले.

भेरड यांनी लॉंग ड्राइव्हवर जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि त्यासाठी त्यांना महागडी बाईक घेणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी हा लडाख पर्यंतचा प्रवास आपल्या वडिलांच्या जवळपास 27 वर्ष जुन्या Suzuki च्या बाईकवर पूर्ण केला. महागडी बाईक घेणं म्हणजे माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला असता, असे भेरड म्हणतात.

महिन्याला 15-16 हजार रुपये कमाई करणारे रिक्षाचालक कैलास भेरड यांनी आपल्या स्वप्नांना जिद्दीचे बळ दिले आणि आपले स्वप्न साकार केले. या प्रवासात त्यांना जवळपास 25 हजार रुपयांचा खर्च आला. त्यांनी एका माध्यमाशी बोलतांना आपला हा प्रवास उलगडला आहे. त्यांनी आपल्या या प्रवासात काय अडचणी आल्या, त्यांना कसे सामोरे गेलो हे सर्व काही सांगितलं आहे.

या प्रवासादरम्यान भेरड यांना 19500 चं पेट्रोल, 1500 रुपयाचं ऑइल आणि इतर खर्च त्यांना या प्रवासात त्यांना आला. त्यांनी मोठ्या हिमतीने, जिद्दीने आपलं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.

(चित्रफीत सौजन्य – BBC)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here