निवडणुकीच्या आधी मोठा ट्विस्ट, अमेरिकेला गेलेला एक आमदार मतदानासाठी मुंबईत दाखल

0
2

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचे मतदान (MLA election results) आज पार पडणार आहे. एक एक आमदाराचे मत यासाठी महत्त्वाचे असणार आहे. राज्यसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचे मत महत्त्वाचे ठरले होते. त्यातच ऐन विधान परिषदेच्या तोंडावर अमेरिकेला गेले बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आता मुंबईत दाखल झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी आता काहीच तासं उरले आहे. अपक्षांचे मत मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांनी कसून तयारी केली आहे. अशातच बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन मत महत्त्वाची ठरणार आहे. पण विधान परिषद निवडणुकीला बहुजन विकास आघाडीचे एक मत कमी पडणार असल्याची शक्यता होती. पण, ऐन शेवटच्या क्षणी ही शक्यता आता दूर झाली आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार मतदान (MLA election results) करणार आहे.

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला एकूण २७ आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून (MLA election results) एकूण ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या ४ जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे ५४ आमदार, शिवसेनेकडे ५६ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत.

या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल. दरम्यान, या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून विधान परिषदेवर (MLA election results) निवडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

भाजपाच्या तर ५ जागा रिक्त होत असून ४ जागाच निवडून येत आहे. पण, भाजपने पाचवी जागा सुद्धा (MLA election results) लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here