Skip to content

दहावीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींची कमाल ; सेम टू सेम गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला


देवळा : तालुक्यातील देवपुरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० % निकाल लागला. या निकालाचे लक्ष वेधून घेतले ते मन्साराम दादाजी अढाव या शेतमजुराच्या जुळ्या मुलिंनी. काजल मन्साराम अढाव व कोमल मन्साराम अढाव या दोघंही जुळ्या बहिणींनी ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे येथे दहाविंच्या परिक्षेत दोघांनी सारखेच ९०.२० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांकास गवसणी घालून विद्यालयाचे व आई वडिलांचे नाव रोशन केले आहे.

कोमल व काजल या दोघंही बहिणिंनी त्यांच्या जुळेपणाप्रमाणेच सेम टू सेम मार्क मिळवल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. काजल व कोमल ह्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व आपल्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्या होत्या त्यामुळेच दहावींच्या परिक्षेत दोघांनी ९०.२०% गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल दुसरा क्रमांक बागुल कावेरी दादाजी ८८.२० टक्के, तिसरा क्रमांकासही अहिरे भुषण रंगनाथ व ठाकरे राज कौतीक या दोघांनीही ८७.६० सारखेच गुण मिळवले आहेत, चौथा क्रमांक अहिरे सोनाली रविंद्र ८७.२० तर पाचवा क्रमांक सोनवणे यश दिलीप व सुर्यवंशी अंकीता संजय या दोघांनीही ८४.८० सारखेच गुण मिळवत यश संपादन केले आहे.

दहावीच्या परीक्षेत यशस्वीरित्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अभिमन देवराम अहिरे, ग्रामपंचायत सदस्य अजय अहिरे, वि. का. सोसायटीचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, सचिव, तसेच शाळेचे मुख्याध्यापक वाघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!