Skip to content

विनायक मेटे पहिल्यांदाच ना ‘आमदार’ ना ‘सत्ताधारी’ पक्षात ; राजकीय कारकीर्द अंधारात


मुंबई : मेटे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांचे राजकिय भविष्य टांगणीला आहे, मराठा समाजाच्या नावावर राजकारण करत 1995 पासून विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमदार विनायक मेटे यांना भाजपने ब्रेक देत चांगलाच धक्का दिला आहे. 27 वर्षांच्या कार्यकाळात सुमारे 25 वर्षे आमदार असलेले विनायक मेटे हे एकमेव आमदार नव्हते. सध्याचे महाविकास आघाडी सरकार राज्यात असून मेटे ना सत्तेत ना आमदार म्हणून मेटेंची अवस्था ना घर के ना घाट की अशी परिस्थिती असून भविष्यातील राजकीय कारकीर्द अंधारात की फडणवीस काही जादू करता हे बघण महत्वाचे आहे. मात्र त्यांचे राजकीय भविष्य हे आता फडणवीसांच्या चरणी असल्याचे दिसत आहे.

मेटे यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षण व इतर प्रश्नांवर सामाजिक चळवळीत सुरू केली. 1994 च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालीन आघाडीला पाठिंबा देत सत्तेचा श्रीगणेशा सुरू केला. विनायक मेटे यांनी सरकार आल्यानंतर विधान परिषदेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी महायुतीत सामील होऊन त्यांचा महाराष्ट्र लोकविकास पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना दोनवेळा विधान परिषदेत संधी दिली. या काळातही मेटे सत्तेत आमदार होते. मेटे मात्र नेहमीच मागच्या दाराने येत जिथे सत्ता तेथे आपले बस्तान बसवले मात्र यावेळी त्यांचा डाव फसला.

मेटे हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुतीमध्ये सामील झाल. त्यानंतरही भाजपची सत्ता आली. पक्षांतरामुळे भाजपने त्यांना आमदारकीची अर्धी टर्म दिली. भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान, विनायक मेटे हे अडीच वर्षे आमदार होते आणि सत्तेत होते. राष्ट्रवादीचे माजी सदस्य असताना ते जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या समर्थकाला आणि बीड नगरपालिकेसाठी दुसऱ्या समर्थकाला उमेदवारी देत होते. व आपले राजकारण सुरू ठेवले.

2014 मध्ये मेटे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली. भाजपची लाट असतानाही बीडमधून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तर, 2017 च्या महापालिका निवडणुकीत बीडमध्ये त्यांच्या शिवसंग्रामच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. मात्र, त्यांच्या पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगली कामगिरी केली. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासह बीड पंचायत समितीतही शिवसंग्रामला सत्ता मिळाली. नंतर मात्र चारही जिल्हा परिषद सदस्य आणि तीन पंचायत समिती सदस्यांनी त्यांना जय महाराष्ट्र करत साथ सोडली.

बीड जिल्ह्यात त्यांचे राजकारण सुरू असून महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजपने त्यांच्या आमदारकीला ब्रेक लावला आहे. त्यांनी नेहमीच भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. मात्र, त्यावेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नेमक का तिकीट कापले हे अद्याप समजू शकलेले नाही.

आज विधानरिषद निवडणूक होत असताना त्यांना उमेदवारी नसल्याने मेटे कुठे आहेत हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. भाजपच्या आनंदात सहभागी होणार की वेगळ्या वाटेच्या तयारीत आहेत हे बघण महत्वाचे ठरेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!