Skip to content

दुर्दैवी घटना..झोका तुटून चिमुकलीचा अंत


जळगाव : घराच्या छतावरील बांधलेल्या साडीच्या झोक्यात तिन्‍ही बहिणी खेळत असताना अचानक झोका तुटून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर दोन जण बहिणी गंभिर जखमी झाल्या आहेत.

एरंडोल (Erandol) तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे कुटूंबासह वास्तव्यास असून अनेक वर्षांपासून ते गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी धनसिंग व त्याची पत्नी शेतात गेले होते. तर धनसिंग यांची आई व त्याच्या तीन मुली घरी होते. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीचा झोका बांधला होता.

अचानक झोका तुटला आणि..

झोक्यात तीन्ही बहिणी खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला. यात अर्चना पावरा या दीड वर्षाच्‍या बालिकेचा मृत्यू झाला. तर साडेतीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!