Skip to content

‘अग्नीपथ’ योजनेसंदर्भात उद्योगपती महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा


मुंबई : काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने अग्निपथ योजनेसंदर्भात सर्वात मोठी घोषणा केली होती. परंतु संपूर्ण देशभरातील अनेक राज्यांमध्ये या योजनेचा विरोध केला जात आहे. तर काही संघटनांकडून आज भारत बंदची घोषणा देखील करण्यात आली. या संपूर्ण गोंधळामध्ये उद्योगपती (Industrialist Anand Mahindra) आनंद महिंद्रा यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून यासंदर्भात माहिती दिली ते म्हणाले की, ‘अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या विरोधामुळे मला फार दुःख झाले आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुनरुच्चार केला होता की अग्निवीर जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह (Industrialist Anand Mahindra) अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो’ असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : 

दुर्दैवी घटना..झोका तुटून चिमुकलीचा अंत

अनेक संघटनांनी अग्निवीरांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन योजनेनुसार, अग्निपथद्वारे भरती झालेल्या अग्निवीरांना चार वर्षांसाठी सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल. मात्र, या कालावधीनंतर २५ टक्के सैनिकांच्या सेवेचा उपयोग करण्याची (Industrialist Anand Mahindra) चर्चा लष्कराने केली आहे.

आनंद महिंद्रा यांच्या घोषणेनंतर काही माध्यमांनी त्यांना नोकरी कोणत्या खात्यात दिली जाईल असे प्रश्न विचारले त्यावर त्यांनी उत्तर दिले, कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व कौशल्य, टीम वर्क आणि शारिरीक प्रशिक्षण यामुळे अग्निवीरांच्या रुपाने उद्योगजगताला व्यावसायिक मनुष्यबळ मिळेल असे (Industrialist Anand Mahindra) त्यांनी म्हटले.

विनायक मेटे पहिल्यांदाच ना ‘आमदार’ ना ‘सत्ताधारी’ पक्षात ; राजकीय कारकीर्द अंधारात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!