Jay Shah ICC Chairman | आयसीसीचे चेअरमन होणारे जय शाह पाचवे भारतीय; चेअरमन होताच होणार मालामाल..?

0
58
Jay Shah ICC Chairman
Jay Shah ICC Chairman

Jay Shah ICC Chairman | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांना आणखी एक मानाचे पद मिळाले असून, या पदावर विराजमान होणारे ते पाचवे भारतीय ठरणार आहेत. जय शाह यांची आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी वर्णी लागली असून, त्यांची काल बिनविरोध निवड झाली.

जय शाह हे सध्या बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. आता 1 डिसेंबरपासून ते आयसीसीचे अध्यक्ष असतील. 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष असलेले न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. तिसऱ्यांदा हे पद भूषवण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जय शहा यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भुषवणारे ते पाचवे भारतीय ठरले आहेत. त्यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन.श्रीनिवासन, शशांक मनोहर हे भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. याबद्दल सविस्तर…

Jay Shah ICC Chairman | जय शाह यांची कारकिर्द

आयसीसीचे अध्यक्ष म्हणून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह याआधी 2009 ते 2013 या दरम्यान गुजरात क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य होते. त्यानंतर 2015 पर्यंत त्यांनी या संघटनेचे संयुक्त सचिव म्हणून काम केले. तर 2015 ते 2019 पर्यंत त्यांनी बीसीसीआयच्या आर्थिक समितीत महत्त्वाचे पद सांभाळले. त्यांना 2021 मध्ये आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर आता ते आयसीसीचे अध्यक्ष म्हणून 1 डिसेंबरपासून कारभार सांभाळतील. (Jay Shah ICC Chairman)

IND Vs NZ | हार्दिक पांड्याच्या जागी संघात कोणाला मिळणार संधी? कोणत्या दोन खेळाडूंची नावं चर्चेत

1. जगमोहन दालमिया-

जगमोहन दालमिया हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय ठरले होते. 1997 ते 2000 या कार्यकाळात ते आयसीसीचे अध्यक्ष होते. 21 सप्टेंबर 2015 रोजी त्यांचे निधन झाले.

2. शरद पवार-

शरद पवार हे दुसरे भारतीय होते ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषविले. भारताच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेले शरद पवार हे 2010 ते 2012 या काळात आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी ते 2005 ते 2008 या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही बीसीसीआयचेही अध्यक्ष होते.

3. एन श्रीनिवासन-

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व आयपीएलमधील क्रिकेट टीम चेन्नई सुपर किंग्जचे सहमालक एन. श्रीनिवासन हे आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणारे तिसरे भारतीय आहेत. 2014 ते 2015 या काळात एन.श्रीनिवासन हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.

4. शशांक मनोहर-

2015 ते 2020 या कार्यकाळात शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष होते. ते चौथे भारतीय आहेत ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषविले.

5. जय शाह-

दरम्यान, यानंतर आता नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांची काल बिनविरोध निवड झाली असून, ते 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असतील. असून, विशेष म्हणजे आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह हे सर्वात तरुण भारतीय असणार आहेत.

ICC World Cup 2023: पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया व्यत्यय येणार ? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती जाणून घ्या

बीसीसीआयकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा 

बीसीसीआयचेही अध्यक्ष व सचिवांसह सर्व बड्या मानद अधिकाऱ्यांना टीम इंडियाच्या सर्व प्रकारच्या बैठकींना किंवा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी 1000 डॉलर्स म्हणजेच तब्बल 82 हजार रुपये इतके मानधन मिळते. यासोबतच त्यांना विमानात प्रथम श्रेणीत प्रवास करणे, देशात किंवा परदेशात त्यांच्या हॉटेल सूट रूमचा खर्चही बीसीसीआय बोर्ड उचलतो. भारतातील विविध बैठकांसाठी त्यांना प्रतिदिवस 40,000 रुपये मानधन मिळते. याशिवाय इतर कामांसाठी वेगवेगळ्या शहरात जाण्यासाठी त्यांना प्रतिदिवस 30 हजार रुपये मानधन मिळते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here