Skip to content

ICC World Cup 2023: पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया व्यत्यय येणार ? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती जाणून घ्या


ICC World Cup 2023: भारतीय क्रिकेट वेडे असल्याचे आपल्याला माहिती आहे, अनेक दिवसांची भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. विश्वचषक सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत, पण भारतीय  टीम  अद्याप विश्वचषक खेळली नव्हती. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तसेच जगभरातील क्रिकेट चाहत्यांना चेन्नईची हवामानाची स्थिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या सामन्यादरम्यान चेन्नईमध्ये पाऊस पडेल की नाही हे आपण जाणून घेवू, समजा पूस पडला तर त्याचे काय विपरीत परिणाम  होतील हे जाणून घेणे आवश्यक आहे.

चेन्नईत आज हवामान कसे असेल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडियमवर होणार्‍या विश्वचषक सामन्याच्या एक दिवस अगोदर शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी स्टेडियमभोवती ढगही होते. गेल्या आठवडाभरापासून चेन्नईमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. मात्र, रविवारी खेळावर पावसाचा परिणाम होण्याची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. रविवारी हवामान मोठ्या प्रमाणात चांगले  राहण्याचा अंदाज असून तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर आर्द्रता 70 च्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून, त्यावेळी पावसाची शक्यता केवळ 8 टक्के इतकीच आहे.

Gold Silver Rate : सोने-चांदीने मारली मुसंडी; सोने-चांदी पुन्हा तेजीत

मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या  सामन्या बद्दल प्रचंड उत्सुकता चाहत्यांना आहे. भारताचा पहिला सामना असल्याने हा आक्रमक आणि विजयी सलामी असावी अशी अपेक्षा भारतीय चात्यांची आहे. तेच  ऑस्ट्रेलिया संघ देखील तुल्यबळ असल्याने हा सामना रंजक होण्याची शक्यता आहे. भारतीय टीम सध्या प्रचंड मेहनत घेत असून  हा  सामना आपल्या नावावर करण्यासाठी कंबर कसले आहे. नुकतेच या दोन संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, जी भारताने 2-1 ने जिंकली. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने चेन्नईमध्ये आतापर्यंत एकूण 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत आणि फक्त 1 सामना गमावला आहे. तर चेन्नई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 2 आणि भारताने फक्त 1 सामना जिंकला आहे. आता आज होणाऱ्या या विश्वचषकाच्या सामन्यात काय होते ते म्हत्वाचे असणार आहे.  (ICC World Cup 2023)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!