Skip to content

Gold Silver Rate : सोने-चांदीने मारली मुसंडी; सोने-चांदी पुन्हा तेजीत


Gold Silver Rate | सोने-चांदीने जागतिक घडामोडींना वेग आणलेला आहे. दोन्ही मौल्यवान धातू पुन्हा तेजीत आले आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम या दोन्ही धातूंवर दिसून आला. यात भारतीय सराफा बाजारपेठेत पितृपक्षामुळे हवी तशी गर्दी नाही. या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानण्यात येत नसल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोने-चांदीने गेल्या चार महिन्यातील निच्चांक गाठला होता. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत या किंमती जास्त असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोने-चांदीने चांगलीच आघाडी घेतली होती. सोने-चांदीत (Gold Silver Rate) मोठी घसरण होणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. दरवाढीला पोषक असणाऱ्या अनेक घटकांवर परिणाम झाल्याने मौल्यवान धातूमध्ये देखील घसरण येण्याचा अंदाज आहे.

मॅडम नुसत्या Reel करतात! शाळकरी पोरं वैतागली

अचानक सोने-चांदीला आली तेजी

गुडरिटर्न्सनुसार,  7 ऑक्टोबरला सोन्यात अचानक तेजी आल्याचं पहायला मिळालं. सोन्यात जवळपास 300 रुपयांची दरवाढ दिसून आली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी सोन्याचे भाव स्थिर होता. 2 ऑक्टोबरला 150 रुपयांनी भाव उतरले होते आणि 5 ऑक्टोबरला 200 रुपयांनी भाव उतरले होते.  22 कॅरेट सोने 52,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीत देखील दिसली तेजी

गेल्या महिन्यात चांदीला आघाडी घेता आलेली नाही.या महिन्याच्या पहिल्या सत्रात किंमती 5000 रुपयांनी पडल्या होत्या. मध्यंतरी चांदीने चढाईचा प्रयत्न केला खरा पण चांदीला लांबचा पल्ला गाठता आलेला नाही. 1 ऑक्टोबर रोजी किंमती जशाच तशा होत्या. 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 400 आणि 500 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली आहे.  सध्या एक किलो चांदीचा भाव 72,100 रुपये आहे.

Big News | ठाण्यात मनसेचं जोरदार आंदोलन सुरु ..नेमकं प्रकरण काय ?

14 ते 24 कॅरेट नक्की कसा आहे भाव?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 56,539 रुपयांपर्यंत घसरले आहेत. 23 कॅरेट 56,313 रुपये, 22 कॅरेट सोने 51790 रुपये, 18 कॅरेट 42,404 रुपये, 14 कॅरेट सोने 33,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहेत. एक किलो चांदीचा भाव 67,095 रुपयांपर्यंत झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत आहे.

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची तुम्हाला शंका असल्यास किंवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकतात. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल व सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते देखील समोर येईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!