लखनऊ : शाळेतले शिक्षक अभ्यास घेत नाहीत काही शिकवत नाहीत. फक्त Reel करत असतात. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्याचं काम करतात. त्यामुळे आम्हाला वर्गात बसण्याची इच्छा नाही, असं म्हणत विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर ठिय्या मांडला. रील बनवणाऱ्या शिक्षकांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे कुटुंबीयही या ठिय्या आंदोलनात सहभागी आहेत. हि घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील सरकारी शाळेत घडलेली आहे.(Reel)
Big News | ठाण्यात मनसेचं जोरदार आंदोलन सुरु ..नेमकं प्रकरण काय ?
या शाळेत ४ महिला शिक्षिका आणि १ पुरुष शिक्षक आहेत. शिक्षिका नेहमी रिल काढत असतात. पुरुष शिक्षक त्यांच्या फोनवर हे रिलचं चित्रीकरण करत असतात. त्यामुळे शाळेतील अभ्यास पूर्णपणे बंद झालेला आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे. शिक्षण विभागासह डीएमकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा पालकांनी केला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी ठिय्या दिल्यानंतर डीएमकडून जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जोपर्यंत शिक्षकांविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत अभ्यास सुरू करणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे.
पूजा आणि नीतू या शिक्षिकांसह आणखी दोन शिक्षिका नेहमी वर्गाबाहेर बसून गप्पा मारत असतात. वर्गात कोणीही शिकवत नाही. आम्हाला जबरदस्तीनं गाईड खरेदी करायला लावले आहेत. त्यांच्या आधारे आमचा अभ्यास सध्या सुरू आहे अशी तक्रार मुलांनी केली. शिक्षिका आमच्याकडूनही व्हिडीओ बनवून घेत असतात. तो यूट्यूब-इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आम्हाला घरी जाऊन तो शेअर करायला सांगतात. पालकांना आमचा व्हिडीओ लाईक करायला सांगा अशा सूचना आम्हाला देतात. व्हिडीओ चांगला यावा म्हणून आम्हाला कामाला लावतात. भांडी घासायला लावतात असा तक्रारी विद्यार्थ्यांनी सांगितल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम