Share Market | एका गुंतवणूकदाराने 90 दिवसांत कमावले 25 कोटी

0
24

Share Market | शेअर बाजारात (Share Market) कोणाचे कधी, कसे नशीब चमकेल हे सांगता येत नाही. आताच गुंतवणूक केली आणि लागलीच छप्परफाड कमाई केली असं कधीही होत नाही. कंपनी आणि शेअर बाजाराचा अभ्यास केल्याशिवाय या जोखीमच्या अथांग महासागरात उडी घ्यायची नसते असं देखील म्हटलं जातं. तर अशाच एका गुंतवणूकदाराने मोठी कमाल केलेली आहे. त्या गुंतवणूकदाराला 90 दिवसांत छप्परफाड कमाई करता आलेली आहे. या कंपनीत केलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरलेली आहे. तीन महिन्यातच त्यांनी 25 कोटी कमावलेले आहेत.

Gold Silver Rate : सोने-चांदीने मारली मुसंडी; सोने-चांदी पुन्हा तेजीत

कोण आहे हे गुंतवणूकदार, यापूर्वी पण त्यांनी अशीच केली होती कमाई

आशिष कचोलिया हे बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आहे. त्यांच्या नावावर यापूर्वी देखील अनेक रेकॉर्ड आहेत. यांचा पोर्टफोलिओ पण अनेक लोक फॉलो करतात. ते बाजारातील मोजक्या यशस्वी आणि नामवंत गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी बाजाराच्या भरवशावर आतापर्यंत 2000 कोटींची संपत्ती उभी केलेली आहे. एका स्मॉल कॅप स्टॉकने त्यांना तीन महिन्यातच ही लॉटरी लागलेली आहे. गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी 25 कोटींची कमाई केली. या स्टॉकने सहा महिन्यात 134.71 टक्क्यांची उसळी घेतलेली आहे.

कोणती आहे ही कंपनी

Balu Forge असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे आशिष कचोलिया यांच्याकडे 21,65,500 शेअर आहे. त्यांनी या शेअरची किंमत 115.45 इतकी असताना ही खरेदी केलेली होती. आज या शेअरची किंमत 230.45 रुपये इतकी आहे. ही कंपनी बेलगममध्ये 1990 मध्ये स्थापन झालेली होती. ही कंपनी वाहनांसाठी crankshafts तयार करते.

मॅडम नुसत्या Reel करतात! शाळकरी पोरं वैतागली

यापूर्वी कोणत्या कंपनीतून कमाई?

GRAVITA INDIA LTD या शेअरने पण आशिष कचोलिया यांना मालामाल केले होते. गेल्या महिन्यात हा मल्टिबॅगर शेअर 154.25 पॉईंटने उभारला होता. या शेअर्सने 52-आठवड्यातील उच्चांकी अंक गाठला होता. 960 रुपयांवर हा शेअर गेल्यावेळी पोहचला होता. सध्या हे शेअर्स 920 रुपयांच्या घरात आहे. या एकट्या शेअरच्या जोरावर दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी गेल्या महिन्यात 22 कोटींहून अधिकची कमाई केलेली होती. त्यांच्याकडे या कंपनीचे 14,84,399 शेअर्स आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला अवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला The Point Now जबाबदार नसेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here