IND vs PAK सामन्याला जात असाल तर सावधान; मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी

0
1

IND vs PAK | अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हल्ल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आलेली आहे. शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पाठवला होता. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी स्टेडिअमची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याआधी स्टेडिअम उडवून देऊ अशी धमकी देणारा ईमेल आलेला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. धमकीला घाबरण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे. (IND vs PAK)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल आलेला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधानांना इजा करण्याची आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी दिलेली होती.धमकी पाठवणाऱ्याने 500 कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगातून सुटका करण्याची मागणीही या मेलद्वारे केली होती.

ICC World Cup 2023: पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया व्यत्यय येणार ? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती जाणून घ्या

अतिरिक्त पोलीस आयुक्त चिराग कोराडिया यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केलेली आहे. शनिवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहेत. यावेळी ते म्हणाले की, 14 ऑक्टोबर रोजी भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान संघ आमने सामने असतील. त्यामुळे या सामन्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी दिली आहे.

कोराडिया म्हणाले की, इतर सामन्याच्या तुलनेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाच ऑक्टोबर रोजी झालेल्या इंग्लंड – न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था कडेकोठ होती. वाहने, हॉटेल, ढाबा यांसह गेस्ट हाऊसची तपासणी देखील करण्यात आली. त्याशिवाय सामन्यात प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने नजर होती. प्रेक्षकांच्या हालचालींवर देखील बारीक लक्ष होते.

Gold Silver Rate : सोने-चांदीने मारली मुसंडी; सोने-चांदी पुन्हा तेजीत

घाबरण्याची गरज नाही कारण, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थित आणि कडेकोट केलेली आहे. कोणत्याही धमकीला अहमदाबाद पोलीस सक्षमपणे उत्तर देईल. 11 ऑक्टोबरपासून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक होईल. अहमदाबाद पोलीस पूर्णपणे तयार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या गेटवर बंदोबस्त ठेवला जाईल. वाहने, हॉटेल्स, गेस्ट हाऊसची तपासणी केली जाईल आणि समाजकंटकांवर नजर ठेवली जाईल. –कोराडिया


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here