Rajkot Fort | ठाकरे ठाण मांडून, राणेही मागे हटायला तयार नाही; राजकोट किल्ल्यावर तूफान राडा

0
50

Rajkot Fort : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. जो अनावरणानंतर अवघ्या 8 महिन्यांतच कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले असून राज्यभरातून शिवप्रेमींनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सत्र सुरू झाला आहे.

Indian Navy | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नौदलाकडून चौकशी समितीची नेमणूक

त्याच प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज राजकोट किल्ल्याला भेट देण्यात आली. यामध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जयंती पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे. राजकोट किल्ल्याची पाहणी करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे व नितेश राणे त्या ठिकाणी पोहोचले परिणामी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे काही वेळाकरिता गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

Chatrapati Shivaji Maharaj | मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला; विरोधकांचा सरकारला इशारा

नेमके काय घडले? 

काही महिन्यांपूर्वी नौदलाकडून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. ज्याचे अनावरण स्वतः पंतप्रधान यांच्या हस्ते नौदल दिनी करण्यात आले होते. या पुतळ्याला वर्षही पूर्ण झाले नव्हते आणि पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधकांकडूनही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्याला आज भेट देण्यात आली. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. परंतु त्याचवेळी भाजपचे नेते नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश राणे तिथे हजर झाले व दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. ज्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर निलेश राणे ही आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

‘एकेकाला ठेचून मारेन’ – नारायण राणे

“त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या. मी एकेकाला बघून घेईन. एकेकाला रात्रभर घरात ठेचून मारेन. यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल.” अशा शशब्दात नारायण राणेंनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here