Chatrapati Shivaji Maharaj | मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला; विरोधकांचा सरकारला इशारा

0
48

Chatrapati Shivaji Maharaj : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात येणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातुंचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौददल दिनी या पुतळ्याचे अनावर केले होते. हा पुतळा आता कोसळला असल्याने शिवप्रेमींकडून मात्र एकच संताप व्यक्त केला जात आहे. पुतळा कोसळण्या मागचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

4 डिसेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामगिरीला व शौर्याला मानवंदना देत या पुतळ्याला उभारण्यात आले होते. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कार्यक्रमही आयोजित केला गेला होता. त्याला खुद्द पंतप्रधानांनी ही हजेरी लावली होती. परंतु पुतळ्याचे अनावरण होऊन वर्ष ही पूर्ण झाले नाही अन् पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून घटनेप्रकरणी रोष व्यक्त केला जात आहे. परंतु पुतळा कोसळण्या मागचे कारण कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

घटने विरोधात ठाकरे गट आक्रमित

“भाजपने राजकारण करण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा कायम वापर केला आहे. या पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून सरकार आता ही जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर ढकलणार आहे. परंतु या पुतळ्याच्या बांधकामासाठी सरकारने खर्च केला आहे. तेव्हा दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, अन्यथा आम्ही शिवप्रेमी फक्त जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करू.” असा इशारा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिला आहे. “मते मिळवण्यासाठी शिवरायांच्या नावाचा वापर करून फक्त आणि फक्त अपमान करण्याचा प्रयत्न या सरकारने केला. निकृष्ट बांधकामापायी वर्षभरातच शिवरायांचा पुतळा कोसळला. महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापि क्षमा करू शकणार नाही.” असे वक्तव्य काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.

दीपक केसरकारांकडून चौकशीचे आदेश

“मला या घटनेविषयी फार कल्पना नाही. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत. त्यामुळे घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी नक्की केली जाईल व लवकरात लवकर पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. छत्रपती शिवरायांनी समुद्रात बांधलेला हा पहिला किल्ला आहे त्यामुळे याच्याशी भावनिक नाळ जोडली गेली आहे. तेव्हा याप्रकरणी आवश्यकत्या सगळ्या दुरुस्ती आमचे सरकार लवकरात लवकर करेल. असे मंत्री दीपक केसरकर यांनी याप्रकरणी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here