Aditya Thackeray : मागील वर्षी नवदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पंचधातूचा पुतळा कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. यातच महाविकास आघाडीकडूनही घटनेचा निषेध करत या विरोधात मालवण येथे आंदोलन करण्यात आले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी देखील करण्यात आली. किल्ल्याची पाहणी करताना भाजप नेते नारायण राणे देखील तिथे आल्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आंदोलन स्थळी भर पावसात भाषण केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरे मोर्चा स्थळी दाखल झाले. जिथे घडलेल्या घटनेविरुद्ध आंदोलन केले जात होते. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परंतु परिस्थितीला न जुमानत आदित्य ठाकरे यांनी भाषण केले. “आपल्या मोर्चामध्ये काही चिंधी चोर आले असून मी त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही. आज घडलेला प्रकार निव्वळ बालिशपणा होता. हा भाजपचा भ्रष्टाचार आहे. या भागातील नेते कसे निवडून आले आहेत हे आपणा सर्वांना माहिती आहे.” असं म्हणत नारायण राणेंना टोला लगावला. त्याचबरोबर आपण या मातीतील लोक आहोत तेव्हा असा भ्रष्टाचार होत असेल तर आपण तिथे गेलं पाहिजे. भाजपने या दहा वर्षांमध्ये जी काही कामे केली त्याला गळती लागली आहे. असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.
Rajkot Fort | ठाकरे ठाण मांडून, राणेही मागे हटायला तयार नाही; राजकोट किल्ल्यावर तूफान राडा
हे सरकार भ्रष्टाचारी- आदित्य ठाकरे
“या देशात एकही असा भाग नाही जिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाही. मग ती मुंबई मेट्रो असो, मुंबई महानगरपालिकेमधले घोटाळे असो किंवा मग अयोध्येतील राम मंदिरात होत असलेली गळती असो. एवढेच काय नव्या संसद भवनात ही पाणी गळते आहे आणि दिल्लीत विमानतळाचे छतदेखील कोसळले.” असं म्हणत सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला.
“भाजप-मिंधे सरकारने शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिले होते हे सर्वांसमोर आले पाहिजे. हे आपटे नेमके कोण होते? तसेच कोणताही अनुभव नसताना एवढे मोठे काम देण्यात कसे आले? अमेरिकेच्या समुद्रावरती बांधलेला एक पुतळा 138 वर्ष टिकला. मग आपल्या इकडे बांधलेला हा पुतळा आठ महिन्यातच कसा कोसळला? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला. त्याचबरोबर हा आपटे नेमका कोण आहे? सध्या कुठे आहे? असा सवाल करीत आपटे कोणाचा तरी मित्र आहे म्हणून त्याला हे काम मिळाले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
Indian Navy | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नौदलाकडून चौकशी समितीची नेमणूक
“आम्ही चार वर्षांपूर्वी संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव दिले आहे. परंतु या मोदी सरकारकडून त्या नावाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.” असा घणाघात त्यांनी केला. “महाराष्ट्रातील या नावांना विरोध आहे का? महाराष्ट्रा बाबतीत इतका द्वेष का?” असे सवाल करीत सरकारवर आरोप केला. त्याचबरोबर “समोरून कितीही अफजल येओत, त्यांच्यासोबत ईडी, सीबीआय घेऊन येओत पण आम्ही झुकणार नाही. आम्ही लढायला कायम तयार आहोत. असं म्हणत त्यांनी यावेळी सरकारला खुले आव्हान दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम