Lalit Patil Case| ‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलंय’ : ललित पाटील

0
2

Lalit Patil Case|   ड्रग्ज माफिया ललित पाटील श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण, त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ललित पाटील याला मुंबई पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना अटकेत असलेल्या ललितने एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. मी पळून गेलो नव्हतो, तर मला पळवलं गेलं होतं; असा खळबळजनक दावा ललित पाटीलने केला आहे. रूग्णालयात आणलं असता ललित पाटीलने मीडियाकडे बघत “मी ससूनमधून पळालो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं. यात कोणाकोणाचा हात आहे. ते सर्व सांगेन”. असा गौप्यस्फोट यावेळी ललितने मीडियासमोर केला.

यामागे कोणाकोणाचा हात, ते लवकरच सांगेन

ललित पाटीलने पोलीसांच्या गाडीत बसण्याआधीच अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकरच मध्यमांसोबत बोलेल आणि खरं काय ते सांगेन. मी ससूनमधून पळालो नव्हतो तर मला पळवलं होतं. आणि मला पळवण्यामागे कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगेन, असं यावेळी ललित पाटील म्हणाला. ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जात असताना मुंबई पोलिसांनी अटक केली. ललित पाटीलसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक झाली आहे. ललित आणि त्याच्या साथीदारांना लवकरच अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Maharashtra politics| एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिंदे सेनेला गळती…?

पळून गेल्यानंतरही ललित पाटील नाशिकमध्येच 

ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील अनेक दिवसांपर्यंत नाशिकमध्येच होता अशी माहिती समोर आली आहे  नाशिक, पुणे, तसेच मुंबई पोलीस ज्याच्या मागावर होते तो ड्रग्ज माफिया ललित पाटील नाशिकमध्ये कसा? त्याच्या डोक्यावर कुठल्या बड्या नेत्याचा हात होता का? कोण वाचवतय ललित पाटील ला? असे अनेक प्रश्न ललितच्या गौप्यस्फोटानंतर समोर येत आहेत. तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती मिळाल्याचे लक्षात येताच त्याने नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदोरवरून तो  सुरतला गेला. सुरतनंतर, नाशिक, धुळे, छ. संभाजी नगर मार्गे कर्नाटकामध्ये  प्रवेश केला.

 काय म्हणाले पोलीस ?

मुंबई पोलिसांचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग परमजीतसिंह दहिया यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली.  “मुंबई पोलिसांना १० ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. त्याप्रकरणाचा तपास करताना  पुणे आणि नंतर नाशिक येथे धाडी टाकल्या. या सर्व कारवायांमध्ये १५० किलो MD ड्रग्ज सापडले, ज्याची किंमत ३०० कोटिच्या जवळपास आहे. या सर्व प्रकरणात हे १५ आरोपी आहेत. ही सर्व आरोपींना आपण अटक केली आहे”, असं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितल आहे.

Lalit Patil | इकडे ललित पाटील अटकेत; तिकडे अंधारेंनी दुसऱ्या नेत्यावरही केले आरोप


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here