Skip to content

IND vs BAN | पुण्यातील सामन्यात नक्की कोण मारणार बाजी?


IND vs BAN | ODI WORLDCUP 2023 मध्ये भारतीय संघाची चौथा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. ही लढत पुण्यातील Maharashtra Cricket Association Stadium वर उद्या 19 ऑक्टोबर रोजी होईल. ICC WORLDCUP 2023 मधील या मैदानावर होणारी ही पहिलीच मॅच आहे. भारताने स्पर्धेतील पहिल्या तिनही सामन्यात शानदार विजय मिळवला होता. पहिल्याच लढतीत ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 8 विकेट्स आणि तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता. बांगलादेशने स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली होती. पहिल्याच सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध त्यांचा 137 धावांनी तर न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव झाला होता.

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारतीय क्रिकेट टिमने 3 सामने खेळले आहेत आणि या तिनही लढती विजय मिळवला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचे पारडे जड असल्याचे दिसते.

कशी आहे पुण्यातील स्टेडियमची खेळपट्टी ?
पुण्यातील एमसीए स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी आदर्श मानली जाते. या मैदानावर आतापर्यंत 7  वनडे सामने झाले आहेत. या 7 लढतीत 8 वेळा 300हून अधिक धावा झालेल्या आहेत. वनडेत या मैदानावर एकदाही 225 पेक्षा कमी धावा झाल्या नाहीत. 2017 साली भारताने इंग्लंडविरुद्ध 351 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 2021 साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 वनडे सामने झाले होते. तेव्हा 5 वेळा 300 हून अधिक वेळा धावा झालेल्या होत्या. त्यामुळे पुण्याची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी चांगली असेल. या ठिकाणी गोलंदाजांना फार संधी मिळेल अशी चिन्ह दिसत नाही.
बांगलादेशची ताकद काय ? 
बांगलादेश या टिमची ताकद त्याची गुगली बॉलिंग आहे. म्हणजे जर खेळपट्टी स्लो आणि टर्न घेणारी असेल तर बंगलादेशची टिम घातक ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला भारताकडे चांगली गुगली बॉलिंग आहे. पण टीम इंडियाची बॅंटिंग देखील मजबूत आहे. सोबत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असे घातक जलद बॉलर आहेत. अशात पीच फलंदाजासाठी अनुकूल ठरले तर बांगलादेश टिमसाठी अडचणीचे ठरू शकते.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!