Maharashtra politics| एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिंदे सेनेला गळती…?

0
26

Maharashtra politics| महाराष्ट्रातील राजकारणावरून  एकीकडे सर्वोच्च न्यायालयात मोठमोठ्या घडामोडी घडत असताना. आता दुसरीकडे पक्षांमध्येही पुन्हा एकदा नाटकीय घडामोडी  होतांना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अवघं वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्ष अदला बदलीला सुरुवात झाली आहे. एकीकडे शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, आता एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी माहिती  समोर येत आहे. शिंदेंच्या सेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेला  रामराम ठोकत शरद पवार गटाची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा हे १९ ऑक्टोबरला शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पांडुरंग बरोरा यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम १९ तारखेला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. शहापूरात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्याविरोधात पांडुरंग बरोरा यांचे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाने शरद पवार गटातर्फे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधणी सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. लवकरच शरद पवार स्वतः  शहापुरमध्ये जाहीर सभादेखील घेणार आहेत.

Lalit Patil | इकडे ललित पाटील अटकेत; तिकडे अंधारेंनी दुसऱ्या नेत्यावरही केले आरोप

पांडुरंग बरोरा कोण आहेत? 

पांडुरंग बरोरा हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते. राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणुकही जिंकले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आमदार पदाचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. १९८० पासून पवारांसोबत असणाऱ्या शहापूरातील बरोरा यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेची वाट धरली होती. त्यावेळी शिवसेनेचे ठाण्याचे पालकमंत्री म्हणजेच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पांडुरंग बरोरा यांची चांगलीच जवळीक होती. त्यामुळे शिंदेंमुळेच खरंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता ह्या दोस्तीत अचानक कुस्ती का झाली? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.  (Maharashtra politics)

Israel Hamas War: इस्रायलविरोधात जगभरातील मुस्लिम एकवटले, सौदीत ५७ देशांची तातडीची बैठक

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here