Devyani Pharande | नाशिकच्या आमदार देवयानी फरांदेंना जीवे मारण्याची धमकी

0
3
Devyani Pharande
Devyani Pharande

Devyani Pharande |  नाशिकमधून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून, यानुसार नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रा. देवयाणी फरांदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची एक कथित पोस्ट सोशल मिडियावर व्हायरलदेखील होत आहे. नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड झाल्याच्या घटनेविरोधात आमदार फरांदे यांनी आवाज उठवला होता. त्याप्रकरणीच त्यांना ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता त्यांच्यापाठोपाठ नाशिकच्या भाजप आमदार देवयाणी फरांदे यांनाही सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. यानंतर नाशिक शहर पोलीसांकडून आमदार देवयाणी फरांदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.(Devyani Pharande)

Nashik Loksabha | ‘मातोश्री’वरून दुसऱ्यांदा बोलावणे; करंजकरांची ठाकरेंकडे पाठ..?

Devyani Pharande | नेमकं प्रकरण काय..?  

नाशिक शहरातील उपनगर भागात ३ एप्रिल रोजी मध्यरात्री एका विशिष्ट जमावाने येथील वाहनांची तोडफोड करत गोंधळ घातला होता. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदेंनी आवाज उठवत नशिक पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता फरांदे यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नाशिकमधील एका २१ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, या प्रकरणाच्या खोलवर जाऊन खऱ्या सुत्रधारांना अटक करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. (Devyani Pharande)

Nashik Lok Sabha | गोडसेंच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरे; गोडसेंचे आणि मनसेचे नाते काय..?

काय म्हणाल्या आ. देवयानी फरांदे? 

नशिक येथे उपनगर परिसरात घडलेल्या घटनेनंतर देवयानी फरांदे यांनी एक पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना नाशिकमध्ये घडली असून,यात एका विशिष्ट धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. हा काही पूर्वनियोजित कट होता का? असे अचानक हे लोक रस्त्यावर कसे उतरले.

हिंदू धर्मीयांमध्ये भीती निर्माण करण्याचे हे काम का आणि कसे करण्यात आले? या घटनेच्या विरोधात पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. “सर तनसे जुदा कर देंगे”, अशा धमकी देणाऱ्या घोषणा या जमावाकडून देण्यात आल्या. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी बघितलेय का? नाशिक पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे? असा सवाल पत्रकार परिषदेत फरांदे यांनी नाशिक पोलिसांना केला होता. तसेच यावेळी त्यांनी करवाई करण्यासाठी नाशिक पोलिसांना 48 तासांचा अल्टीमेटम देखील दिला होता. (Devyani Pharande)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here