Deola | मयंक जाधव याची नवोदय विद्यालयासाठी निवड

0
14
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मल्हार हिल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु. मयंक विजय जाधव या विद्यार्थ्यांची खेडगाव (दिंडोरी) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. मयंक जाधव याने नवोदयसाठी घेतलेल्या परीक्षेत चांगले यश संपादन केले व गुणवत्ता यादीत नंबर पटकविला. याबद्दल त्याचा व त्याच्या पालकांचा शिक्षक सघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  मयंक याचे देवळा पंचायत समितीचे माजी सभापती बापू देवरे, प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संजय भामरे, प्राथमिक शिक्षक समितीचे शशिकांत शिंदे, पदवीधर शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किरण अहिरे, कसमा पतसंस्थेचे माजी.

Deola | चांदवडचा शुभम बरकले केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

चेअरमन अरुण पवार, बागलाण शिक्षक पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्रावण खैरनार,संचालक निलेश पाटील, अमोल अहिरे, धनराज भामरे, तुषार धोंडगे आदींनी अभिनंदन केले आहे. संजय भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शशिकांत शिंदे यांनी केले तर आभार किरण अहिरे यांनी मानले. मयंक हा खर्डे येथील रहिवासी व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी विजय जाधव यांचा मुलगा आहे. तसेच त्याची आई शिक्षिका असून त्याला आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

Deola | खर्डे येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here