Skip to content

Deola | चांदवडचा शुभम बरकले केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मोठ्या पगाराची नोकरी असताना केवळ प्रशासकीय सेवेची ओढ निर्माण झाली आणि या ध्येयपूर्तीसाठी एकलव्यासारखी साधना करत व कोणताही कोचिंग क्लास न लावता शुभम उत्तम बरकले याने प्रशासनातील वर्ग १ पदाला गवसणी घातली. ग्रामीण भागातील मुलांसाठी हे प्रेरणादायी यश आहे. कारण शुभमचे मूळ गाव चांदवड तालुक्यातील परसुल हे असून त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक नेमिनाथ जैन चांदवड येथे झाले. पवई (मुंबई) येथे आयआयटीत सिव्हिलची पदवी मिळवत व कॉलेज प्लेसमेंटमध्ये बंगळुरू येथील एक्सऑन मोबिल कंपनीत मोठया पगाराची नोकरी मिळाली.

Deola | खर्डे येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी 

मात्र आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी हा जॉब सोडत हे यश मिळवले. विशेष म्हणजे शुभमने पहिल्या वर्गापासूनच नाही तर पवई येथील आयआयटीतही आपल्या वर्गात प्रथम क्रमांक कायम सोडला. आयआयटीत रौप्यपदकाचा तो मानकरी राहिला. हॉंगकॉंग मध्ये इंटर्नशिप करत एक नवा अध्याय त्याने जोडला. असे सारे काही असताना आणि कामाचा भला मोठा व्याप असताना आणि त्यात कोणताही कोचिंग क्लास न लावता रोज १०-१२ तास अभ्यास करून अर्थात स्वयंअध्ययनातून आणि पहिल्याच प्रयत्नात शुभमने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएसई २०२३ यात ८३७ वी रँक मिळवली. आणखी एक बाब म्हणजे शुभम संगीत उपांत्य विशारद आहे. शुभमचे वडील उत्तम बरकले हे प्राथमिक शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. शुममला प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Deola | खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रथ मिरवणूक; विविध कार्यक्रमांचे आयोजन

आत्मविश्वास, अपार कष्टाची तयारी, कुटुंबाची साथ आणि स्वयंअध्ययन यातून हे यश मिळाले. ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रामाणिक प्रयत्न करावेत. वेळेचा सदुपयोग करावा.

– शुभम बरकले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!