Skip to content

Raj Thackeray | राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर जाहीर सभा

Raj Thackeray

Raj Thackeray |  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करतील अशी माहिती समोर आली होती. यानंतर आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी दिली आहे. (Raj Thackeray)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला असून, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असून, त्यांच्यासाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करेल असे जाहीर केले होते. त्यानंतर आता ही मोठी माहिती अमित ठाकरेंनी दिली आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray | ‘मोदी नसते तर, राम मंदिर झाले नसते’; ठाकरेंकडून मोदींवर ‘कौतुकसुमने’..?

महायुतीचे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई

अमित ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर असून, ते पुण्यात प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. तसेच याद्वारे ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी महायुतीचे काम करण्यासंदर्भात आढावा घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला असून, मनसे महायुतीच्या प्रचारातही सहभागी होणार आहे. तर, जे मनसे पदाधिकारी महायुतीचे काम करणार नाहीत. त्यांच्यावरती कारवाई केली जाणार असल्याचे आदेशही मनसेकडून देण्यात आला आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray | राज ठाकरेंसमोर भाजपची अट; मनसेकडे फक्त एक दिवस

Raj Thackeray | वसंत मोरे सोशल मीडियाच्या आहारी

दरम्यान, पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात होता. यानंतर वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली असून, ते आता पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंवर निशाणा साधला असून,”वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत.”अशी खोचक टिका त्यांनी मोरेंवर केली.

मनसेने लोकसभा निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर त्यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस, शरद पवार गटाचेही दार ठोठावले. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आल्यानंतर त्यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि आता ते वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.(Raj Thackeray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!