Skip to content

Deola | खर्डे येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी 

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा शहर व तालुक्यात रामजन्मोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. खर्डे येथे रामजन्मोत्सव निमित्ताने ह.भ.प अनंत महाराज कजवाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी संपूर्ण गावातून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. रथाचे महिलांनी औक्षण केले. सायंकाळी उशीरापर्यंत मिरवणूक चालली. मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली. याचे नियोजन यात्रा कमिटीने केले होते. यानिमित्ताने याठिकाणी उद्या गुरुवारी (दि. १८) रोजी यात्रा भरण्यात येणार आहे.

दरम्यान, गावागावातील राम मंदिरांमध्ये भजन, आरती, पाळणे गात धार्मिक कार्यक्रम पार पडले. राम मंदिर स्थापनेनंतर पहिली रामनवमी कार्यक्रम देवळा शहरातही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. मांडवाची मिरवणूक काढत मंदिरावर मांडव टाकण्यात आला. यावेळी योगेश आहेर, अतुल आहेर, गोटू शिंदे, प्रमोद शेवाळकर, हिरामण आहेर, उमेश देवरे, मगन प्रजापत, कार्तिक शेवाळकर, गौरव जाधव, काकाजी शिंदे, स्वयंसेवक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. श्रीराम मंदिरात अभिषेक, आरती, भजन, कीर्तन, गाणी, पाळणे म्हणण्यात आले व त्यानंतर श्रीरामांचा जन्मउत्सव सोहळा मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला. त्यानंतर रामरस व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

Deola | खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रथ मिरवणूक; विविध कार्यक्रमांचे आयोजन

खुंटेवाडी येथील राममंदिरातही रामजन्मोत्सव साजरा झाला. गावातील भजनी मंडळाने भजने गात व आरती गात रामनवमी साजरी झाली. प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहचे नियोजन करण्यात आले.
खर्डे ता.देवळा येथेही रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरास रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली. सकाळी अनंत महाराज कजवाडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी प्रभू श्रीरामांच्या रथाचे मानकरीचा लिलाव होऊन रथाची संपूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

Deola | देवळा दुर्गा माता यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्ष पदी दिलीप आहेर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!