Skip to content

Deola | देवळा दुर्गा माता यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्ष पदी दिलीप आहेर

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्ष पदी माजी नगरसेवक दिलीप आहेर यांची तर उपाध्यक्ष पदी चेतन आहेर तसेच खजिनदार पदी हर्षद भामरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. देवळा येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैवत दुर्गा मातेची अक्षय्य तृतीयाला यात्रा भरते. यावर्षीच्या ह्या यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्ष पदी माजी नगरसेवक दिलीप सयाजी आहेर यांची तर उपाध्यक्ष पदी चेतन गोविंद आहेर व खजिनदार पदी हर्षद शिवाजी भामरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात्रेनिमित्त भव्य शोभा यात्रा, कुस्त्यांची दंगल, लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी गटनेते संजय आहेर, जेष्ठ नगरसेवक जितेंद्र आहेर, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, नगरसेवक अशोक आहेर, योगेश आहेर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, अतुल पवार, दिलीप आहेर, योगेश वाघमारे, प्रदिप आहेर, किशोर आहेरे, संदीप आहेर, भुषण आहेर, रोशन आहेर आदी सदस्य उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!