Skip to content

Deola | देवळा येथे स्वीप उपक्रमा अंतर्गत मतदार जनजागृती फेरी

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. स्वीप उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य नोडल अधिकारी – स्वीप आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागासाठी तालुका निहाय नोडल अधिकारी स्वीप म्हणून जिल्हा व तालुका अधिकारी यांची नेमणूक केली. त्यानुसार देवळा तालुक्यात ग्रामीण भागासाठी भरत वेंदे गटविकास अधिकारी यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

आज सोमवार रोजी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा शहरातून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत वेंदे यांच्या नियोजनुसार पंचायत समितीचे सर्व विभागांचे विभाग प्रमुख राजेंद्र चव्हाण, शामकांत पाटील, देवीसिंग मांडवडे, नानासाहेब पवार, राजेश निकुंभ, डॉ. संतोष पजई, राजेश विसावे, प्रवीण संधान, सुनील देवरे यांचेसह सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी देवळा शहरातून मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.

देवळा | खर्डे येथील ओमकार आहेर ह्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

मतदान करावे जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी हा यातील प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार देवळा शहरातील पाच कंदील, बाजार गल्ली, बसस्थानक परिसरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कर्मचारी यांनी मतदार जनजागृतीच्या घोषणा देत “मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो, वोट द्यायला जायचे आहे – आपले कर्तव्य बजवायचे आहे, मत द्या आपला आवाज ऐकू द्या, तसेच हातात जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून जनजागृती करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे हिरालाल पाकळे, सचिन धस, प्रितम आहेर, योगेश दशपुते, महेश भामरे, प्रदीप केदारे, राजेंद्र जगताप, सुनील महाले, रविंद्र पवार, रेणुका शेवाळे, राजश्री मते, शम्मी बोहरी यांच्या सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होऊन सहभागी झाले होते.

देवळा | खर्डे ते मुलूखवाडी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!