देवळा | खर्डे येथील ओमकार आहेर ह्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

0
36
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी तील विद्यार्थी कु. ओमकार श्रीकांत आहेर या विद्यार्थ्यांने आर्थिक दुर्बल घटक एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपदान केले असून, त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. सदर विद्यार्थ्यांला इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी 12000 रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ह्या यशाबद्दल त्याचे प्राचार्य दिलीप रणधीर, प्रा. संजय आहेर, कैलास चौरे, आर.एन. आहिरे, पी.ए देवरे, व्ही.एस महाले,

Deola | देवळा येथील मेतकर पतसंस्थेला २५ लाख १० हजार रुपयांचा नफा

डी.पी.परचुरे, आर.के.ठाकरे, ए.के.आढाव, प्रशांत काकुळते, श्रीमती व्ही. एम.पाटिल ,एम.बी. जाधव, एस. एल.सोनवणे, किशोर क्षत्रिय आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विद्यालयात महापुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. व शिष्यवृत्ती परीक्षा गुण यादीत यश मिळविल्याबद्दल कु. ओमकार आहेर याचे गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Deola | थकीत मानधन द्या, अन्यथा उपोषण; देवळा पोलीस पाटील संघटनेचा इशारा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here