Skip to content

देवळा | खर्डे ते मुलूखवाडी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील खर्डे ते मुलूखवाडी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर खडीचे ढीग टाकून ठेवले असून, यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधींनी याकामी लक्ष देऊन तात्काळ कामाला सुरुवात करावी, अशी मागणी येथील हर्षद मोरे, मोहन देवरे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा खर्डे ते मुलूखवाडी या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. ह्या रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने गेल्या अनेक महिन्यांपासून खडी टाकून ठेवली आहे. ह्या रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे याठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत तसेच अनेकांना शारीरिक त्रास देखील सहन करावा लागत आहे.

Deola | देवळा येथील मेतकर पतसंस्थेला २५ लाख १० हजार रुपयांचा नफा

सदर रस्ता हा जि.प.च्या अंतर्गत असून, काम का रखडले आहे ?, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. याकडे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी मागणी होत आहे. रस्ता खराब त्यात रस्त्यावर टाकून ठेवलेल्या खडींच्या ढिगाऱ्यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, मनःस्ताप सहन करावा लागत आहे. याची संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता इ व द च्या कार्यालयाला कुलुप ठोकण्यात येऊन, रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हर्षद मोरे, मोहन देवरे आदींसह येथील नागरिकांनी दिला आहे.

Deola | थकीत मानधन द्या, अन्यथा उपोषण; देवळा पोलीस पाटील संघटनेचा इशारा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!