Salman Khan | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सरकार खडबडून जागे..?

0
7
Salman Khan
Salman Khan

Salman Khan | आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास बॉलीवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला असून, या गंभीर घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे सलमान खानसोबत चर्चाही केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून सलमान खानला अतिरिक्त सुरक्षादेखील पुरवली जाणार असून, त्याच्या घराबाहेरील सुरक्षादेखील वाढवणार आहे. येथील सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले असून, युद्धपातळीवर पोलिस या आरोपींचा शोध घेत आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली असून, ही पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडलेल्या घटनेबाबत सलमान खानसोबत फोनवरून चर्चा केली.(Salman Khan)

Salman Khan | नेमकं प्रकरण काय..?

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. इतकंच नव्हे तर यासाठी स्वत: सलमान खानने अत्यंत महागडी अशी बुलेटप्रूफ गाडीही खरेदी केली आहे. दरम्यान, कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही सलमानच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर दोन अज्ञातांनी तीन राऊंड फायरिंग केली आणि या गोळीबारानंतर या आरोपींनी येथून पळ काढला. सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणालाही काही दुखापतही झालेली नाही.(Salman Khan)

Salman Khan ‘Tiger 3’ Vs ‘The Marvels’; दोन्ही चित्रपट एकाच दिवशी येणार भेटीला

राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत..?

दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत..? असा थेट सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला असून, घटनेबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. त्याबाबतची माहिती ही आम्हाला मिळेल. ज्यावेळी आम्हाला याबाबत अधिक माहिती मिळेल, तेव्हा आम्ही ती देऊ. त्यामुळे आता काही अटकळबाज्या करण्यात अर्थ नाही.”(Salman Khan)

Salman Khan On Death Threat: ‘मै सब का भाई नहीं हूं …’ जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यावर सलमान खानने मौन सोडले

राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची

दरम्यान, यावर भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की,“हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाही. जिथे उद्योजकांच्या घरांसमोर जिलेटीन ठेवले जाणार आणि मग सचिन वाझे हे त्याचा हिस्सा होणार. असं काही व्हायला हे काय उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही आमची आहे,” असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. (Salman Khan)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here