Lok Sabha Election | पाच वर्ष कुठे होतात..?; भाजप आमदाराला गावकऱ्यांनी झापले

0
2
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election |  सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. गावोगावी जाऊन पदाधिकारी आपापल्या नेत्यांचा प्रचार करत आहेत. दरम्यान, अशाच एका गावात भाजप उमेदवाराच्या प्रचाराला गेलेल्या भाजप आमदाराला गावकऱ्यांनी आल्या पावली माघारी पाठवले आहे. एकीकडे आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यात येणाऱ्या पाच वर्षासाठी मोदींनी ११ नवीन गॅरंटी दिल्या आहेत. मात्र, दुसरीकडे नांदेडच्या एका गावात भाजप आमदाराला गावकऱ्यांनी गावं येण्यापासून अडवले आहे.  “याआधी गेली पाच वर्ष तुम्ही गावात कधी आलात का?” असे प्रश्न करत गावकऱ्यांनी आमदार साहेबांना धारेवर धरले. त्यामुळे निरुत्तर झालेल्या आमदार साहेबांना आल्या पावली परत जावे लागले. (Lok Sabha Election)

दरम्यान, अधिक माहितीनुसार भाजप आमदार राजेश पवार हे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या नायगाव मतदारसंघात भेटीगाठी घेत असून, येथीलच गोदमगाव या गावात राजेश पवार हे प्रचारासाठी गेले होते. यावेळी “गेल्या पाच वर्षात तुम्ही गावात किती वेळेस भेट दिली?, असा सवाल करत गावकऱ्यांनी त्यांना वेशीवरच अडवले. आमदार राजेश पवार यांनी चर्चेचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर ठेवला. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना  विरोध करत कोणतीही चर्चा केली नाही. गावकरी नाराज असल्यामुळे आमदार राजेश पवार आल्या पावली गावातून परतले. (Lok Sabha Election)

Lok Sabha Election | ‘या’ नेत्यांसाठी निवडणूक अवघड; राऊतांनी केले भाकीत..?

Lok Sabha Election | नेमकं प्रकरण काय ? 

महायुतीकडून नांदेड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. दरम्यान, भाजपचे नायगाचे आमदार राजेश पवार हे आपल्या मतदारसंघातील गोदमगाव येथे चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गावकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी गेले असता, त्यांना गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला.(Lok Sabha Election)

गावातील तरुणांनी त्यांना थेट गेल्या पाच वर्षात गावात तुम्ही कितीवेळा आले? असे प्रश्न विचारलेत. अनेक विकास कामांबाबत वारंवार मागणी करूनही ती कामे होत नसल्याने गावकऱ्यांनी पवार यांना धारेवर धरले. पवार आणि त्यांच्या समर्थकांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यामुळे गावकरी आक्रमक झाल्याचे पाहून आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला.(Lok Sabha Election)

Lok Sabha Election | राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पोस्टरवर ‘दादां’नाच जागा नाही..!

ग्रामीण भागातून विरोध का ? 

अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ग्रामीण भागात जाणाऱ्या नेत्यांना विरोध होत असल्याचे पाहायला मिळत असून, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि विकास कामे प्रलंबित असल्याने प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना ग्रामीण भागात विरोध केला जात आहे. यापूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांना आणि त्यांच्या पत्नीलाही विरोध करण्यात आला होता. तर पुणे जिल्ह्यातील काही गावांनी तर थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे. (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here