Lok Sabha Election | ‘या’ नेत्यांसाठी निवडणूक अवघड; राऊतांनी केले भाकीत..?

0
36
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election |  सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धूम सुरू असून, आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून, यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे भाकीत केले आहे.

मराठवाड्यातील ठाकरे गटाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावाही यावेळी राऊतांनी केला आहे. यावेळी बोलतांना खासदार संजय राऊत म्हणाले की, “मराठवाड्यात ठाकरे गटाचे चारही उमेदवार मोठ्या ताकतीने निवडून येतील आणि जालना व लातूरमध्ये बदल होईल हेदेखील खात्रीने सांगतो. नांदेडमधील आदर्श टॉवर कोसळेल आणि पंकजा मुंडे यांच्यासाठीही निवडणूक सोपी नसेल, असा दावा राऊतांनी केला आहे. (Lok Sabha Election)

Lok Sabha Election | राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पोस्टरवर ‘दादां’नाच जागा नाही..!

Lok Sabha Election | आंबेडकरांसमोर हात जोडले, त्यांच्या विनवण्या केल्या..?

याचवेळी संजय राऊत यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला असून, ते म्हणाले की,”प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडिसोबत राहावं म्हणून आम्ही हात जोडले, त्यांच्या विनवण्या केल्या. संविधानाच्या रक्षणासाठी त्यांनी आमच्या सोबत यावं ही सगळ्यांचीच भूमिका होती. आम्ही त्यांना ६ जागाही देऊ केल्या होत्या. मात्र, प्रकाश आंबेडकर यांचे अनेकांशी वाद आहेत. त्यांच्या वादात आम्ही का पडावं. पण, त्यांच्यासाठी आजही आमचे दरवाजे उघडे आहेत, असं आवाहनही संजय राऊतांनी आंबेडकरांना केले. (Lok Sabha Election)

Lok Sabha Election | शिंदेंचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात..?

भाजपने बीफ निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून कोटींचा निधी घेतला

“मोदींचे नाने हे घासून पुसून गुळगुळीत झाले आहे. त्यामुळे मोदी मोदी आता बाजारात चालत नाहीये. कोण चिकन खातंय आणि कोण खात नाही हा काही प्रचाराचा मुद्दा नाहीये. भाजपने बीफची निर्यात करणाऱ्या ५ कंपन्यांकडून साडेपाचशे कोटींचा निधी घेतला आहे. मोदींनी याचं उत्तर द्यावं. भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणे हे चांगलंच आहे. “मोदी चेहरा आहे की मुखवटा” हा देशच ठरवेल. “लोक भूत आलं, भूत आलं म्हणतात आणि मुलं घाबरतात या चेहऱ्याला, असा खोचक टोला राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लगावला आहे. (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here