Skip to content

BJP Manifesto | मोदींच्या ११ मोठ्या घोषणा; मोफत रेशन आणि उपचार

BJP Manifesto

BJP Manifesto |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभरात जोरदार तयारी केली असून, भाजपच्या नेत्यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी प्रचाराचे रान उठवले आहे. यातच आता भाजपने  लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गँरंटी – भाजपचा संकल्प’ या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजपने आज हा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि शेतकरी या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे. (BJP Manifesto)

BJP Manifesto | पाच वर्ष मोफत रेशन

भाजप आपल्या जाहीरनाम्यातून जनतेला काय गँरंटी देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, अखेर आज हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून, यात देशात रोजगार निर्मिती आणि उद्योजकता यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच जनतेला पुढील पाच वर्ष मोफत रेशन, पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आणि जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. (BJP Manifesto)

BJP | काय सांगता..! चोरांनी भाजप अध्यक्षांचीच फॉर्च्युनर कार चोरली

मोदींच्या ११ मोठ्या घोषणा

 • देशात रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेभर विशेष भर देणार.
 • पुढील पाच वर्ष ‘मोफत रेशन योजना’ सुरु राहणार.
 • पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार मिळणार.
 • ७० वर्षांवरील वृद्धांना ‘आयुषमान भारत’ योजनेचा लाभ दिला जाणार.
 • पाईपच्या माध्यमातून स्वस्त गॅस घराघरात पोहोचवणार.
 • नागरिकांवरील वीजबिलाचा भार कमी करून तो शून्य करण्यासाठी प्रयत्न करणार.
 • गरीबांसाठी अनेक नवीन योजना राबविणार. (BJP Manifesto)
 • तृतीयपंथीयांनाही आयुषमान भारत या योजनेचा लाभ दिला जाणार
 • महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असून, तब्बल 3 कोटी महिलांना ‘लखपती दिदी’ करणार, महिलांना आयटी, आणि टुरिझमकडे क्षेत्राकडे वळवणार.
 • तसेच सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर देणार.
 • मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाख करणार. (BJP Manifesto)

Congress | २५ ‘गॅरंटींचा काँग्रेसचा जाहीरनामा; बघा काँग्रेस जनतेला काय काय देणार

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!