Skip to content

Jalgaon | १ खासदार ठाकरे गटात अन् ४०० कार्यकर्ते शिंदे गटात 

Jalgaon

Jalgaon | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे आपल्या सोयीनुसार पक्षांतर करताना दिसत आहेत. यातच आता जळगावमध्ये ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे जळगावमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली असे मानले जात होते. दरम्यान, यातच आता जळगावमधील ठाकरे आणि शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Jalgaon)

 काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी मंत्री जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार चिमणराव पाटील आदी उपस्थित होते. जळगावमधील अंमळनेर आणि चोपडा येथील ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या तब्बल 400 कार्यकर्त्यांनी आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी 60 ते 70 वाहनांच्या ताफ्यातून हे कार्यकर्ते बुलढाण्यात पोहोचले आणि बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे हा पक्षप्रवेश पार पडला.

Raj Thackeray | ‘मोदी नसते तर, राम मंदिर झाले नसते’; ठाकरेंकडून मोदींवर ‘कौतुकसुमने’..?

नुकसान भरपाई दिली जाणार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही 

या भव्य अशा पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून ते म्हणाले की,”आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत गुंतलेलो असलो तरी, मी दररोज सकाळी प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहितीही घेतो आणि त्यांना सूचना देतो. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.(Jalgaon)

भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा  

दरम्यान, यावेळी भाजपाच्या जाहीरनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा असून, त्याचे मी स्वागत करतो. हा जाहीरनामा सर्वसामान्यांचं जीवन बदलणारा जाहीरनामा असून, त्याचे मी स्वागत करतो आणि पंतप्रधान मोदींना धन्यवाद देतो.(Jalgaon)

BJP Manifesto | मोदींच्या ११ मोठ्या घोषणा; मोफत रेशन आणि उपचार

Jalgaon | खासदार ठाकरे गटात; कार्यकर्ते शिंदे गटात  

भाजपने जळगाव लोकसभेचे तिकीट स्मिता वाघ यांना दिल्यानंतर विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे नाराज होते. त्यानंतर त्यांनी परोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश केला आणि यानंतर करण पवार यांना ठाकरे गटाने तिकीटही जाहीर केले. उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर स्मिता वाघ यांच्याविरोधात पक्षातीलच मोठे आव्हान उभे राहणार होते. दरम्यान, आता इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा ठाकरे आणि शरद पवार गटासाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जात आहे. (Jalgaon)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!