Nashik Lok Sabha | गोडसेंच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरे; गोडसेंचे आणि मनसेचे नाते काय..?

0
4
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha |  महायुतीत नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून वाद सुरू आहे. हा तिढा अजूनही सुटण्याचे नाव घेत नाही. तर, दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आश्वासन दिले असून, त्यांना कामाला लागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे गोडसेंनी सांगितले होते. त्यामुळे आता गोडसेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. (Nashik Lok Sabha)

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही नेते नाशिकच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही हेमनात गोडसेंनी आपल्यालाच तिकीट मिळेल या आशेने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

Nashik Lok Sabha | प्रचारपत्रकावर राज ठाकरेंचा फोटो 

दरम्यान, मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता हेमंत गोडसेंनी आपल्या प्रचारपत्रकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो लावला आहे. राज ठाकरेंचा फोटो असलेल्या या प्रचारपत्रकाचे मतदार संघात हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांकडून वाटप सुरू झाले आहे. छगन भुजबळ, हेमंत गोडसे यांच्यानंतर नाशिक लोकसभेच्या उमेदवारांच्या इच्छुकांच्या यादीत आणखी काही नवीन नावे सामील झाली होती. मात्र, तरीही हेमंत गोडसे हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.  (Nashik Lok Sabha)

Loksabha Election | मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – आमदार डॉ. राहुल आहेर

हेमंत गोडसेंचं मनसेसोबत काय नातं..?

हेमंत गोडसे हे गेल्या दोन टर्मला शिवसेनेच्या तिकिटावर नाशिकमधून लोकसभेवर निवडणून आले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतूनच केली होती. २००७ ते २०१२ या काळात ते नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य होते. यानंतर पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेवर निवडून आले आणि याद्वारे त्यांचा शहराच्या राजकारणात प्रवेश झाला.

यापूर्वी २००९ च्या निवडणुकीत ते मनसेकडून प्रथमच समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो झळकल्याने यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.(Nashik Lok Sabha)

Lok Sabha Election | पाच वर्ष कुठे होतात..?; भाजप आमदाराला गावकऱ्यांनी झापले

गोडसेंना कामाला लागण्याचे आदेश 

नाशिकच्या उमेदवारीसाठी खासदार हेमंत गोडसे हे सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांची लगतार ठाणे आणि मुंबई वारी सुरू आहे. दरम्यान, काल पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचाराला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली आहे.(Nashik Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here